शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

वंचित आघाडीला मुस्लीम मते कमी प्रमाणात मिळाली - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 2:56 AM

विधानसभा निवडणूक वंचित स्वबळावर लढणार की काँग्रेस आघाडीसोबत जाणार, यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. पुढील रणनीती आणि भूमिका यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करू

अकोला : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतांमुळे या आघाडीची ताकद सर्वांनाच दिसली आहे. मात्र औरंगाबाद वगळता इतरत्र मुस्लीम समाजाची मते कमी प्रमाणात मिळाली, असे आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा निवडणूक वंचित स्वबळावर लढणार की काँग्रेस आघाडीसोबत जाणार, यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. पुढील रणनीती आणि भूमिका यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमसंदर्भात संशयाचे धुके कायमच असून, त्या विरोधात आता लढा देण्याचे ठरविले आहे. इतर पक्षांनी त्याचे समर्थन करावे, असे आवाहन त्यांनी केले. आघाडी व युतीच्या राजकारणात संघटनेची माती होते. जागा वाटपाच्या मुद्दामुळे अनेक कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही. त्याचा परिणाम संघटनेवर होतो. काँग्रेस त्याचे उत्तम उदाहरण आहे. जागा वाटपाच्या याच गुंत्यामुळे काँग्रेस पक्षाची स्थिती आता केवळ ‘एनजीओ’ सारखीच राहील, असे आंबेडकर म्हणाले.

राजू शेट्टींचे स्वागत आहेराजू शेट्टींना वंचित सोबत येण्याचे निमंत्रण आम्ही दिले होते; परंतु ते काँग्रेस आघाडीसोबत गेले.आता विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

...तर राज ठाकरेंना सुवर्णसंधीविधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत अ‍ॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केले. ज्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार नाहीत, त्या जागांवर मनसे आपली ताकद पणाला लावून शिवसेनेची मते ‘कॅश’ करू शकतात. मनसेला पुनरागमन करण्यासाठी ही शेवटची सुवर्णसंधी ठरेल, असे आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर