शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पीएमसी बँकेतील ठेवीदारांची एक लाखांची रक्कम सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 19:50 IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आर्थिक अनियमिततेमुळे पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत.

ठळक मुद्देदेशातील सात राज्यांमध्ये १३७ शाखा असून, ११ हजार ७१७ कोटी रुपयांच्या ठेवी

पुणे : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेमधे (पीएमसी) तब्बल ५१ हजार ठेवीदार-खातेदारांचे पैसे अडकले आहेत. पैसै काढण्यासाठी निर्बंध असले तरी ठेवीदांच्या १ लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण असल्याने त्यांचे लाख रुपये रक्कमेपर्यंचे पैसे सुरक्षित आहेत. तसेच, अडचणीतील खातेदारांना हार्डशिप अंतर्गत आरोग्य, शिक्षण, लग्न अशा कारणांसाठी पैसे दिले जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आर्थिक अनियमिततेमुळे पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. देशातील सात राज्यांमधे १३७ शाखा असून, ११ हजार ७१७ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेवर ३५-अ नियमांतर्गत नियामक निर्बंध घातले आहेत. ही कारवाई पुढील सहा महिन्यांसाठी आहे. बँकेला कोणत्याही प्रकारे कर्ज नूतनीकरण करता येणार नाही. तसेच, नव्याने कर्ज देता येणार नाही. मात्र, गुंतवणूक आणि नवीन ठेवी स्वीकारण्यास निर्बंध घातले नसल्याचे बँक प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, अगामी काळ सणांचा असल्याने, या काळात कर्जाला अधिक मागणी असते. कर्ज वितरणाचे निर्बंध बँकेच्या पथ्यावर पडणार आहेत. रुपी, शिवाजीराव भोसले, लोकसेवा सहकारी आणि बीएचआर बँकेवर अलिकडच्या काळात निर्बंध निर्बंध घातल्याने अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. डिपॉझिट इन्शूरन्स अ‍ॅण्ड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे (डीआयसीजीसी) ठेवींचा विमा उतरविला जातो. त्यानुसार एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम संरक्षित असते. अगदी बँक दिवाळखोरीत जरी निघाली तरी तितकी रक्कम ठेवीदारांना मिळते. गेल्या पंचवीस वर्षांपासून विमा संरक्षित रक्कम तितकीच आहे. काळानुरुप त्यात ५ लाख रुपयापर्यंत वाढ करावी अशी मागणी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. मात्र, त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. ही रक्कम वाढल्यास सामान्य खातेदारांना अधिक दिलासा मिळेल. 

टॅग्स :PuneपुणेPMC Bankपीएमसी बँकGovernmentसरकारReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक