विदर्भ राज्यविरोधी पक्षांना हद्दपार करा

By Admin | Updated: January 19, 2017 00:18 IST2017-01-19T00:18:54+5:302017-01-19T00:18:54+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीला विरोध करणाऱ्या शिवसेना, मनसे आणि काँग्रेस पक्षालाही विदर्भातून हद्दपार करा

Deport to Vidarbha state parties | विदर्भ राज्यविरोधी पक्षांना हद्दपार करा

विदर्भ राज्यविरोधी पक्षांना हद्दपार करा


अमरावती : स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीला विरोध करणाऱ्या शिवसेना, मनसे आणि काँग्रेस पक्षालाही विदर्भातून हद्दपार करा, असे भावनिक आवाहन विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केले.
आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या वतीने स्वतंत्र विदर्भ व शेतकरीहिताच्या मागण्यांकरिता २३ जानेवारीपासून आयोजित बेमुदत उपोषणाबाबत धोटे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीचा लढा हा फार जुना आहे. शेतकरी, बेरोजगार, कामगार, शोषित, भ्रष्टाचार व व्यसनमुक्त विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, या मागणीसाठी आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे खंदे कार्यकर्ते आता मैदानात उतरले आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीची मागणी ही राजकीय नाही. मात्र, काही राजकीय पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्य होऊ नये, यासाठी पराकोटीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीला विरोध करणारे प्रमुख पक्ष जसे शिवसेना, मनसे व त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षालाही विदर्भातून हद्दपार करावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
हिंदी भाषकांची अनेक राज्ये निर्माण झाली आहेत, मग मराठी भाषकांची दोन राज्ये का होऊ शकत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची जबाबदारी केंद्र शासनावर आहे. देशात आणि राज्यात भाजपाचे शासन असल्याने आता स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आवाज बुलंद करण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले. स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीची मागणी शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी २३ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले
जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Deport to Vidarbha state parties