शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

मर्जितल्या ठेकेदारांना काम देण्याचा उद्यान विभागाचा डाव

By admin | Updated: May 14, 2017 01:07 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे स्थापत्यची अनेक कामे प्रस्तावित आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे स्थापत्यची अनेक कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. मर्जीतील आणि नेहमीच्याच ठेकेदारांना हाताशी धरून संबंधित निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया पारदर्शी नसून यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. उद्यान विभागाच्या या अनागोंदी कारभाराला आळा घालून संबंधित निविदा प्रक्रिया स्थगित करावी, या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.सत्तांतर झाल्यानंतर भाजपाची सत्ता आली आहे. उद्यान विभागातील गैरकारभारावर आक्षेप घेतला आहे. महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे अनागोंदी आणि बेशिस्त कारभाराला आळा घालावा, अशी मागणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. उद्यान विभागातर्फे महापालिकेच्या अबकडईआणि फ या सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वृक्षरोपणासाठी खड्डे खोदणे आणि माती टाकणे या कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. काही ठेकेदारांना हाताशी धरून संबंधित कामांची निविदा मिळविली जाते. मर्जीतील ठेकेदारांना या निविदा प्रक्रियेत झुकते माप देत निविदा प्रक्रियेतील गोपनियतेचा भंग केला जातो. निविदेची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. निविदेत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी खर्च अपेक्षित धरला आहे. या निविदेत खड्डे किती घेणार, किती ठिकाणी माती कशी टाकणार आदी बाबींचा तपशील नाही. त्यामुळे ही निविदा दिशाभूल करणारी आहे. अधिकारी केवळ वेळ मारून नेत सर्वसामान्यांची फसवणूक करीत असल्याचे यातून दिसून येते. पारदर्शी कारभाराला तिलांजलीही बाब संबंधित अधिकाऱ्यांना लक्षात न येणे म्हणजे त्यांच्या बौद्धिक क्षमतेबाबत आणि संबंधित विषयातील त्यांच्या अभ्यासाबाबत प्रश्न उपस्थित होतात. असे असले तरी, केवळ भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने दिशाभूल करणारी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतून निविदेच्या गोपनियतेचा भंग होऊन कायद्याची पायमल्ली करण्यात येत आहे. याचा फटका महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला बसणार आहे. कारण महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. पारदर्शी कारभार करण्याचे भाजपाचे धोरण आहे. या धोरणाला तिलांजली देत उद्यान विभागातील अधिकारी कोणालाही न जुमानता मनमानी कारभार करत आहे. ही बेशिस्त आणि अनागोंदी कारभार थांबविणे आवश्यक आहे. झाडे फक्त कागदोपत्रीच उद्यान विभागात पारंपरिक पद्धतीने दिशाभूल करणाऱ्या निविदा दरवर्षी प्रसिद्ध करण्यात येते. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामे केली जात असल्याचे कागदोपत्री दाखविले जाते. प्रत्यक्षात कामे झाल्याचे दिसून येत नाही. यातून मोठा भ्रष्टाचार करण्यात येत आहे. महपालिकेच्या संकेतस्थळावरदेखील या निविदा प्रसिद्ध केल्या जातात; मात्र तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून अशा निविदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात विलंब केला जातो. परिणामी निविदा प्रक्रिया सदोष होते. दहा वर्षांतील उद्यान विभागातर्फे केलेल्या कामांची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी भाजपा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.