शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘त्याच्या’ किडनीदानास नकार, औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 03:10 IST

दोन्ही किडन्या निकामी झालेल्या डॉक्टर भावाला गतिमंद भावाची जुळणारी किडनी देण्याची परवानगी मागणारी याचिका गुरुवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली.

औरंगाबाद : दोन्ही किडन्या निकामी झालेल्या डॉक्टर भावाला गतिमंद भावाची जुळणारी किडनी देण्याची परवानगी मागणारी याचिका गुरुवारी उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाने फेटाळली.वैद्यकीय अहवाल व न्यायालयातील प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारावर न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी हा निर्णय दिला.अवयवदानविषयक कायद्यातील कलम ९ (सी) नुसार गतिमंद व्यक्तीच्या अवयव दानास प्रतिबंध आहे. यामुळे दोन्ही किडन्या निकामी झालेल्या २८ वर्षांच्या डॉक्टरच्या वÞडिलांनी याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना गतिमंद दात्याचा वैद्यकीय अहवाल व न्यायालयातील प्रत्यक्ष मुलाखत यावरून दाता अवयवदानास सक्षम नसल्याचे मत नोंदवत न्यायालयाने अवयवदानास परवानगी नाकारत याचिका फेटाळली.काय होती याचिका?नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील डॉ. अतुल पवार या डॉक्टरच्या दोन्ही ‘किडन्या’ निकामी झालेल्या आहेत. त्यांच्या एका भावाच्या किडन्या डॉ. अतुलशी जुळतात. म्हणून पवार कुटुंब औरंगाबादला बजाज रुग्णालयात आले आहे.मात्र, डॉ. अतुलचा ‘तो’ भाऊ गतिमंद असल्यामुळे रुग्णालयातील अवयवदानविषयक समितीने गतिमंद दात्याचे अवयवदान करण्यास ‘ह्युमन आॅर्गन अँड टिश्यूज ट्रान्सप्लान्ट अ‍ॅक्ट’ १९९४ च्या कलम ९ (१) नुसार प्रतिबंध असल्याचे कारण दर्शवून त्या दात्याची पुढील वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला. यामुळे डॉ. अतुलचे वडील गणपतराव संभाजीराव पवार यांनी अ‍ॅड. पी.के. जोशी यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.पवार कुटुंबाचे दुर्दैव-किडनीदान कायद्याच्या फेºयात अडकलेल्या डॉ. अतुलच्या दोन्ही किडन्या निकामी (फेल) झालेल्या आहेत. वडील ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असल्यामुळे ते किडनीदान करू शकत नाहीत. डॉ. अतुलच्या एका बहिणीला आईने किडनीदान केल्यामुळे आई एकाच किडनीवर जिवंत आहे. तसेच त्यांच्या ज्या बहिणीला ती ३ वर्षांची असताना आईने किडनीदान केले होते. तिच्याही दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत.ज्या भावाच्या किडन्या अतुलशी जुळतात तो गतिमंद असल्यामुळे कायद्यानुसार त्याचे किडनीदान होऊ शकत नाही, तर शिक्षक असलेल्या भावाच्या किडन्या अतुलशी जुळत नाहीत, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबाद