शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

अपंग आयुक्तालयाला हवा संचालनालयाचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 07:05 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या जकार्ता येथे झालेल्या परिषदेत जगातील अपंगांची संख्या लोकसंख्येच्या २५ टक्के इतकी आहे.

ठळक मुद्देदिव्यांगांचे २१ प्रवर्ग झाल्याने मनुष्यबळाची भासणार गरजगेल्या वर्षभरापासून या प्रस्तावर कोणताही झालेला नाही निर्णय राज्यात २०११ सालच्या जनगणनेनुसार २९ लाख ५९ हजार इतकी दिव्यांगांची संख्यादृष्टीदोष (अंधत्व), शारीरिक दिव्यांगता, बौद्धिक दिव्यांगता, बहुविकलांगता असे सहा प्रवर्गनुकत्याच झालेल्या अधिवेशनात दिव्यांग धोरणाचा घोषवारा जाहीर

विशाल शिर्के पुणे : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रवर्गांची संख्या सहावरुन २१ इतकी झाली आहे. त्यामुळे दिव्यांगांची संख्या वाढणार असल्याने अपंग कल्याण आयुक्तालयात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे आक्तालय आणि संचालनालय अशी आयुक्तालयाची द्वीस्तरीयरचना करुन, ५२१ पदांना मंजुरी द्यावी अशाी मागणी अपंग कल्याण आयुक्तालयाने सामाजिक न्याय मंत्रालयाकडे केली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून या प्रस्तावर कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्र सरकारने २०१६मध्ये अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ संपूर्ण देशात लागू केला आहे. राज्यात पुर्वी दृष्टीदोष (अंधत्व), शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुविकलांगता अशा सहा प्रवर्गासाठी दिव्यंगत्व प्रमाणपत्र दिले जात होते. त्यात आणखी १५ प्रवर्ग समाविष्ट केले आहेत. राज्यात २०११ सालच्या जनगणनेनुसार २९ लाख ५९ हजार इतकी दिव्यांगांची संख्या आहे. प्रवर्गाच्या संख्येत वाढ झाल्याने दिव्यांगांची संख्येत मोठी वाढ होणार आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या जकार्ता येथे झालेल्या परिषदेत जगातील अपंगांची संख्या लोकसंख्येच्या २५ टक्के इतकी आहे. अपंग व्यक्ती अधिनियमानुसार अपंगांसाठीच्या राखीव ३ टक्के निधीचा आढावा, दिव्यांगांच्या सरकारी नोकरीतील राखीव जागा याचा आढावा आयुक्तालयाला घ्यावा लागतो. तसेच, अपंग कल्याण आयुक्तांना अर्धन्यायिक स्वरुपाचे अधिकार आहेत. त्यामुळे त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागांना अधिनियमानुसार निर्देश देण्याचे काम आयुक्त करतात. राज्यातील लोकसंख्या आणि भविष्यातील कामकाजाचा वाढणारा पसाला लक्षात घेऊन योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यात आयुक्तालय आणि संचालनालय अशा दोन यंत्रणांची उभारणी गरजेची आहे. काही राज्यात अशी यंत्रणा असल्याचे अपंग कल्याण आयुक्तालयाने सप्टेंबर २०१७च्या पदांच्या आकृतीबंध पत्रात म्हटले आहे. राज्याने नुकत्याच झालेल्या अधिवेशनात दिव्यांग धोरणाचा घोषवारा जाहीर केला आहे. त्यात २१ प्रवर्गांसह, शिक्षण, आरोग्य, रोजगार, पुनर्वसन अशा विविध योजना स्वीकारल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी मनुष्यबळ आवश्यक असल्याचे अपंगकल्याण आयुक्तालयाचे म्हणणे आहे. ----------------------------

आयुक्तालयाने मागितलेली पदे 

पदांचा वर्ग        आयुक्तालय        संचालनालय        प्रादेशिक स्तर    जिल्हा      अपंग संस्था        विरार        एकूण    अ            ४            ५            ---            ---        ---            १        १०ब            ६            ८            ---            ---        ६            २        २२क            १०            २६            १४            १०८        १३०            २०        ३०८ड            २            ३            ००            ००        ८२            ३        ९०बाह्यस्त्रोत        ००            ००            ००            ७२        ००            ००        ७२मानधन        ००            ००            ००            ००        १९            ००        १९एकूण            २२            ४२            १४            १८०        २३७            २६        ५२१        ---------------------------- २०११ च्या सार्वत्रिक जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या १ अब्ज २१ कोटी १ लाख ९३ हजार ४२२- सहा प्रवर्गानुसार देशात २०११ साली २ कोटी ६८ लाख १४ हजार ९९४ दिव्यांग - राज्यातील दिव्यांगांची संख्या२९ लाख ५९ हजार 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारApang Kalyan Aayuktalayaअपंग कल्याण आयुक्तालय