शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

कारखान्यांची मालमत्ता विकून उसाचे पैसे देण्याची मागणी; राजू शेट्टी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 04:37 IST

साखर आयुक्तालयावर मोर्चा, आंदोलन स्थगित

पुणे : उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम न देणाऱ्या कारखान्यांची मालमत्ता जप्त करुन शेतकºयांचे पैसे व्याजासह द्यावेत, त्यासाठी कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) बजावावे, कारखान्याच्या संचालक मंडळावर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून सोमवारी शेतकºयांनी साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला. दिवसभर धरणे आंदोलन केले.एफआरपी थकविलेल्या कारखान्यांवर तत्काळ आरआरसी कारवाई करण्याचे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्यानंतर संघटनेने मुक्काम आंदोलन स्थगित केले. रात्री उशिरा गायकवाड यांनी शेट्टी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली.कारखान्यांची साखर जप्त करण्यासह सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांना देण्यात येतील, असेही गायकवाड यांनी लेखी पत्र देऊन सांगितले.स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, अ. भा. किसान संघर्ष समितीचे योगेंद्र यादव यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. दुपारी दोनच्या सुमारास लोकमान्य टिळक चौकाकडून शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे मोर्चा काढण्यात आला. साखर संकुलाबाहेर मोर्चा अडविण्यात आला. त्यामुळे हा रस्ता दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. शिष्टमंडळाने साखर आयुक्त गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन दिले. शुगर केन कंट्रोल अ‍ॅक्टनुसार ऊस तुटल्यापासून १४ दिवसांच्या आत विनाकपात एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे. मात्र १७४ हून अधिक कारखान्यांकडे एकूण ५,३१९ कोटी रुपयांची एफआरपीची थकबाकी आहे.एफआरपी देण्यासाठी साधारण ३ हजार कोटी रुपयांची तूट जाणवत आहे. सरकारने तितक्या रक्कमेची हमी घ्यावी. अन्यथा कारखान्यांची मालमत्ता जप्त करुन पैसे द्यावे.- राजू शेट्टी, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी