शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आलिशान घरांची मागणी घटली; नोकरीतील अस्थिरता, मंदीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 02:23 IST

नोटाबंदीचा झालेला परिणाम आणि रेरा कायद्यातील काही तरतुदी यामुळे राज्यातील एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या आलिशान घरांची मागणी प्रचंड प्रमाणात घटली आहे.

पुणे : नोटाबंदीचा झालेला परिणाम आणि रेरा कायद्यातील काही तरतुदी यामुळे राज्यातील एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या आलिशान घरांची मागणी प्रचंड प्रमाणात घटली आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला १५ ते ७० लाखांच्या फ्लॅटना मागणी वाढल्याने त्यामुळे बांधकाम क्षेत्राला उर्जितावस्था आली आहे.काही वर्षापासून बांधकाम उद्योगात मंदीचे वातावरण होते. यातून हे क्षेत्र सावरत असले तरी आलिशान घरांचे प्रकल्प सुरू करणारे व्यावसायिक मात्र प्रचंड अडचणीत आले आहेत. आलिशन फ्लॅट विकलचे जात नसल्याचे चित्र आहे. नोकरीतील अस्थिरता. मंदीमुळे नोकरी टिकते का, हा प्रश्न निर्माण झाल्याने गोल्फ कोर्स किंवा व्हिला सध्या नकोच, त्यापेक्षा लहान फ्लॅट घेण्याची मानसिकता वाढत आहे.आयटी अभियंता असलेले चिराग कुलकर्णी दोन वर्षांपासून घर घेण्याचे ठरवीत आहेत. पती-पत्नी दोघेही कमावते असल्याने त्यांना एक कोटींचा फ्लॅट ते पाहत होते. परंतु, आयटी क्षेत्रातील मंदीमुळे अनेकांच्या नोकºया जात आहेत. त्यामुळे ५० ते ६० लाखांपर्यंतचा फ्लॅट ते पाहत आहेत.प्राध्यापक असलेल्या संजय कुरकुंडे यांची पत्नी एका बहुराष्टÑीय कंपनीत कायदेविषयक सल्लागार आहे. त्यांनी एका नामांकित गृहप्रकल्पामधील फ्लॅटचा सौदा जवळपास पूर्ण केला होता. परंतु, व्याजदरात होत असलेली वाढ आणि पत्नीच्या नोकरीची नसलेली शाश्वती यामुळे आता दोन बेडरुमचेच घर घेण्याचे त्यांनी ठरविले आहे.दिवाळीत मध्यमवर्गासाठी सात हजार घरेपुण्यातील बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नवरात्र ते दिवाळी या महिनाभराच्या कालावधीत नवीन सात हजार घरांचे प्रकल्प सादर होत आहेत. त्यातील तब्बल ६० टक्के घरे ही ३० लाखांच्या आतील असतील. उर्वरीत घरांच्या किंमती ३० ते ८० लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. तसेच परवडणाºया श्रेणातील अडीच ते तीन हजार घरे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. आलिशान या सदरात मोडणारी १ कोटी आणि त्या पुढील रक्कमेच्या घरांना जवळपास खरेदीदार नाही.

टॅग्स :Homeघर