शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

दिवाळीसाठी किराणा, ड्रायफ्रूटच्या मागणीत तब्बल दहापटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 09:05 IST

फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंना मोठी मागणी

- अभिजित कोळपेपुणे : कोरोना महामारीनंतर परिस्थिती पूर्ववत होत असल्याने यंदाची दिवाळी नियमांचे पालन करून धूमधडाक्यात साजरी होत आहे. त्यादृष्टीने मार्केटमध्ये रेलचेल दिसून येत असून किराणा आणि ड्रायफ्रूटच्या मालाला दहापटीने मागणी वाढणार आहे. दसऱ्यापासून ते देवदिवाळीपर्यंतच्या कालावधीत पुणे मार्केटमध्ये साधारणपणे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा विश्वास पुण्यातील होलसेल बाजारातील मोठ्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. खरेदीचा असाच धमाका राज्यभरात असेल, असेही त्यांनी सांगितले.दोन महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ड्रायफ्रूटच्या विविध मालाचे मोठ्या प्रमाणात दर वाढले होते. माल येणार नाही, आयातीवर परिणाम होईल म्हणून बदाम ८०० रुपयांवरून १२०० ते १४०० रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, तसे काहीही झाले नाही. त्यामुळे ते पुन्हा ८०० रुपयांवर आले आहेत. अशाच प्रकारे खारीक, काजू, मनुके, बदाम यांचे दर वाढले होते; मात्र सर्व ड्रायफ्रूटचे दर ‘जैसे थे’ झाले असून, ते स्थिर आहेत.भाजक्या पोह्याला सर्वाधिक मागणीयंदा परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे किराणा मालाची मागणी दहापटीने वाढणार आहे. उदा. भाजका पोहा १०० पोती एका महिन्यात विकला जायचा, आता दसरा ते देवदिवाळी या २० दिवसांच्या कालावधीत दहापटीने वाढून एक हजार पोती विकला जाईल, असे होलसेल व्यापारी राजेश शहा, विनोद गोयल यांनी सांगितले.फराळाच्या वस्तूंना कशी मागणी आहे? तेल, पोहा, भाजका पोहा, मक्का पोहा, भाजकी डाळ, मुरमुरा, भडंग, भगर, मुरमुऱ्याचा चिवडा, लाडू बनविण्यासाठी बुंदी, फरसाण त्याचबरोबर एकमेकांना गिफ्ट, भेटवस्तू देण्यासाठी जास्त करून ड्रायफ्रूट या काळात लागतात. त्यात काजू, मनुके, बदाम आदींना प्रामुख्याने मागणी असते, असे ड्रायफ्रूटचे होलसेल व्यापारी नवीन गोयल यांनी सांगितले.दर वाढले किंवा कमी झाले? सध्या पुण्याच्या बाजारात किराणा मालात तेल, शेंगदाणा, बेसन, ड्रायफ्रूटसह इतर सर्व वस्तूंचे भाव स्थिर आहेत. दोन महिन्यांपूर्वी ड्रायफ्रूटचे वाढलेले दर पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहेत. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021