शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

हक्कभंगावरून रण पेटले! विधिमंडळ की चोरमंडळ म्हटल्याने संजय राऊतांवर हक्कभंगाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 06:16 IST

विधिमंडळात गदारोळ; विरोधकांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी कोल्हापुरात ‘विधिमंडळ नव्हे चोरमंडळ’ असे स्फोटक विधान केल्याचे तीव्र पडसाद उमटून विधानसभा व विधान परिषदेत बुधवारी अभूतपूर्व गोंधळ; जोरदार घोषणाबाजी झाली.  कामकाज वारंवार तहकूब झाले व नंतर ते दिवसभरासाठी गुंडाळले गेले. राऊत यांचे विधान महाराष्ट्रद्रोही असल्याचे सांगत सत्तापक्षाने विधिमंडळ डोक्यावर घेतले आणि तत्काळ कारवाईची जोरदार मागणी केली. दुसरीकडे विरोधकांसंदर्भात देशद्रोही हा शब्द वापरल्याबद्दल महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस दिली आहे.

भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी विधानसभेत तर राम शिंदे यांनी विधान परिषदेत राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस दिली आणि ठाकरे गट तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीलादेखील घेरले. सत्तारुढ सदस्य वेलमध्ये उतरून राऊत यांच्या अटकेची मागणी करू लागले.  राऊत वा त्यांच्या विधानाचा बचाव कसा करायचा, हा  प्रश्न पडल्याने बॅकफूटवर जाण्याची वेळ आलेली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांसंदर्भात बोलताना देशद्रोही असा उल्लेख केल्याचा मुद्दा विरोधकांच्या मदतीला धावून आला.

दिवसभरासाठी कामकाज तहकूबn सत्तापक्षाच्या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभेचे कामकाज चार वेळा व नंतर दिवसभरासाठी तर विधान परिषदेचे कामकाज दोनवेळा व नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले. n राऊत यांच्या विधानावरून आता विरोधकांनी विधान परिषदेत शिंदे यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस दिली असून विधानसभेतही गुरुवारी हक्कभंग आणण्याची तयारी चालविली आहे.

संविधान नव्हे, जनतेचाही अपमानn विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले, की विधिमंडळ नव्हे चोरमंडळ असे विधान करणे हे सभागृहांतील सदस्यांचा अपमान करणारे, सदस्यांचाच नव्हे तर संविधानाचा व जनतेचाही अपमान करणारे आहे. n हे अत्यंत गंभीर असून सभागृहाची ऊज्ज्वल परंपरा पायदळी तुडविली गेली आहे. या विधानाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. ती येत्या दोन दिवसात करून आपण ८ मार्चला सभागृहात आपला निर्णय देवू.

नंतर केली सारवासारवविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पडसाद उमटल्यानंतर राऊत यांनी मला विधिमंडळाबद्दल आदरच आहे. ज्या ४० लोकांनी आमचा शिवसेना पक्ष चोरला, चिन्ह चोरले त्यांचे विधिमंडळ म्हणजे चोरमंडळ बनू नये, असे मला म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण दिले.

काय म्हणाले राऊत...विधिमंडळ पक्ष नव्हे, तर चोरमंडळ n कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष म्हणजे डुप्लिकेट चोरमंडळ आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली. n संसदेत खासदार गजानन कीर्तिकर यांना गटनेता करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याअनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले, ही खरी शिवसेना नसून डुप्लिकेट आहे. n विधिमंडळ पक्ष नव्हे, तर चोरमंडळ आहे. त्यामुळे त्यांनी पदावरून हटवले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. n कारण अशी अनेक पदे आम्हाला उद्धव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत. त्यामुळे गटनेतेपदासारखी अनेक पदे ओवाळून टाकतो.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतvidhan sabhaविधानसभा