शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणामुळे मातीच्या विटांची मागणी घटली; व्यावसायिक झाले त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 23:45 IST

बांधकामासाठी सिमेंटच्या विटांचा मोठ्या प्रमाणावर वापर

पोलादपूर : आधुनिक काळात सिमेंटचा वापर अधिकाधिक वाढत असल्याने पारंपरिक मातीच्या विटा मागे पडू लागल्या आहेत. दिवसेंदिवस विटांची घटती मागणी पाहता, वीट व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा वीट व्यवसाय आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून व्यावसायिक हतबल झाले आहेत.

बांधकाम व्यावसायिक इमारत उभारताना सिमेंटच्या बॉक्स ना प्राधान्य देत आहेत. हाताळायला हलके असल्याने तसेच बांधकाम करण्यास सुलभ असल्याने मातीच्या विटांच्या जागी बॉक्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने स्थानिक वीट व्यावसायिक मंदीच्या सावटाखाली असल्याचे दिसून येत आहे. आज सिमेंटच्या वस्तू वापरण्याकडे लोकांचा अधिक कल आहे. त्यामुळे पूर्वीपासून वापरात असलेल्या या पर्यायी वस्तू आणि त्या तयार करणाऱ्या व्यावसायिकांचा कल आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. कुंभार समाजातील अनेकांचा या विटा तयार करून रोजीरोटी चालविण्याचा व्यवसाय आहे. अनेक कुंभार बांधवांची गुजराण या वीट व्यवसायावरच आहे. त्यासाठी आपल्या मीठ-भाकरीच्या संसारासह इतर गावांमध्येही त्यांची अनेक कुटुंबे जातात. त्यामुळे चार महिने अतिशय काबाडकष्टाच्या या व्यवसायास आता सुरुवात झाली आहे. एका विटेला साधारणत: सात ते आठ वेळा हात मारावा लागतो. माती उत्कृष्टरीत्या मळावी लागते आणि विटेच्या लोखंडी किंवा लाकडी साच्यामध्ये घालून या विटा काढाव्या लागतात. मग त्या पक्क्या स्वरूपात आणण्यासाठी भट्टीमध्ये भाजाव्या लागतात. एवढ्या सगळ्या प्रक्रियेत उन्हातान्हात कष्टाचे काम करूनही शेवटी सात हजार ते आठ हजार रुपयांना एक हजार विटा, असा दर मिळतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंबास चार महिने केलेल्या मेहनतीवर शेवटी पाणी पडते, त्यामुळे व्यवसाय सध्या धोक्यात आहे.1. आज सिमेंटच्या विटांना वाढती मागणी आहे. त्यामुळे या मातीच्या भाजलेल्या विटांची मागणीही आता कमी होत आहे. त्यामुळे कित्येक वीट व्यावसायिकांनी स्वत: उत्कृष्ट कारागीर व या व्यवसायात पारंगत असूनही या व्यावसायातील मालकीपणा बाजूला ठेवून स्वत: इतरांकडे मजुरीस जातात. फायद्यापेक्षा अधिक प्रमाणात तोटा व धोकाच या व्यवसायात पत्करावा लागतो.2. अनेकदा वीट व्यावसायिकांकडे आदिवासींसह कर्नाटकमधील कामगार रोजंदारीवर काम करत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कामगारांची कमतरता तसेच वीटला उठाव नसल्याने मातीचे वाढते दर, भट्टीसाठी लागणारे साहित्य महाग झाल्याने वीट उत्पादक हतबल झाले आहेत. त्यातच बांधकाम व्यावसायिकच इमारत उभारताना सिमेंटच्या बॉक्सला प्राधान्य देत असल्याने वीट उत्पादकांवर उपासमारीची वेळ आली आहे.