शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Results: सदा न् कदा आम्हीच राज्य करू हा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला; शिवसेनेचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 13:00 IST

आपनं 70 पैकी 56 जागांवर आघाडी घेतलेली असून, केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत.

मुंबईः दिल्ली निवडणुकीत आपचा विजयी वारू भाजपाला रोखता आलेला नाही. आपनं 70 पैकी 56 जागांवर आघाडी घेतलेली असून, केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत. परंतु आपलाही यंदा गेल्या वेळच्या तुलनेत अपेक्षित यश मिळालेलं नाही, तर भाजपाला 3 वरून 14 जागा मिळत असल्याचा कल समोर आला आहे. हाती आलेल्या कलानंतर शिवसेनेनंही आता प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पार्टीला दिल्लीतल्या लोकांनी नाकारलेलं आहे, असं म्हणत शिवसेना नेते अनिल परब यांनी टीकास्त्र सोडलं आहे.  सदा न् कदा आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय कोणीच राज्य करू शकत नाही हा जो अहंकार असतो. तो लोक कधी ना कधी तरी उतरवतात. आपची सत्ता जी पाच वर्षं होती, ती दिल्लीतल्या लोकांनी मान्य केलेली आहे. भारतीय जनता पार्टीला लोकांनी नाकारलेलं आहे, असंही अनिल परब म्हणाले आहेत. तसेच मोदींच्या देशद्रोह्यांसंदर्भातील विधानाचा हवाला देत शिवसेनेनं त्यावर भाष्य केलं आहे. देशद्रोहाची व्याख्या काय हे सर्वात महत्त्वाचं असून, ते लोकांनी मान्यसुद्धा करायला पाहिजे. एका व्यक्तीनं देशद्रोहाची व्याख्या करणं म्हणजे ती देशद्रोहाची व्याख्या होत नाही. लोकांनादेखील ती मान्य असावी लागते. लोकांना काय मान्य आहे ते लोकांनी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रात जे सत्तापरिवर्तन झालेलं आहे, त्याचा परिणाम दिल्लीत दिसतो आहे. देशाच्या राजकारणाला शिवसेनेनं वेगळं वळण दिलं आहे. त्या वळणाचे परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. दिल्लीत आपची सत्ता उलथवण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून भाजपाचे दिग्गज नेते उतरवले गेले होते. एवढे सगळे दिग्गज नेते उतरवल्यानंतरही दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशावर ते आपला कब्जा करू शकलेले नाहीत. जिंकू शकलेले नाहीत. यातच सगळ्या पुढच्या भविष्याची दिशा दिसते आहे. दिल्लीकरांनी पूर्ण भाजपालाच नाकारलं आहे. आता भाजपाचे जे प्रमुख दिल्लीत बसतात, त्यांनाच नाकारलं असल्याचं आम्ही समजतो, असं म्हणत अनिल परब यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाdelhi electionदिल्ली निवडणूक