शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोदी लाटेमुळे भोरमध्ये सुळेंच्या मताधिक्यात घट

By admin | Updated: May 17, 2014 21:45 IST

सुप्रिया सुळे यांना गतवेळी ७१,३८१ मतांची आघाडी मिळाली होती. या वेळी मात्र भोरमधून १३,७४२ व वेल्हेतून ३,४५१ अशी १७,१९३चीच आघाडी मिळाली.

सूर्यकांत किंद्रे भोर : भोर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना गतवेळी ७१,३८१ मतांची आघाडी मिळाली होती. या वेळी मात्र भोरमधून १३,७४२ व वेल्हेतून ३,४५१ अशी १७,१९३चीच आघाडी मिळाली. मुळशीत जानकरांनी ३०८ मतांची आघाडी घेतली आहे. भोर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान ३,०५,११८ होते. पैकी १,७९,९५२ (५८ टक्के) मतदान झाले. २००९मध्ये २,७९,५०३ पैकी १,३७,८६२ (४९.३२ टक्के)च मतदान झाले होते. नव्याने ४२,०९० मतदार वाढले. हे मतदार, मोदी फॅक्टर व प्रस्थापितांच्या विरोधात लाट यांमुळे सुळेंना गतवेळीपेक्षा ५४,१८८ मतदान कमी झाले. भोर तालुक्यातील वीसगाव, आंबवडे, हिडार्ेशी वेळवंड, भुतोंडे व महुडे खोर्‍यात, गुंजवणी भागात सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाली; तर महामार्गावरील व आसपासचा काही गावांमध्ये महादेव जानकरांनी भोर शहरात ६०४ मतांची आघाडी घेतली. कारी खानापूर व उत्रौली-रायरी गटात सुळेंना १० ते १२ हजारांची आघाडी आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह जाणवत नाही. पाच ते नवव्या फेरीपर्यंत जानकरांना अधिक मताधिक्य मिळाले. भोर, वेल्हे व मुळशी या तालुक्यांतील धनगर समाजाचे एकगठ्ठा मतदान जानकरांना मिळाल्याचे चित्र त्या गावांमध्ये आहे. कारण, इतर उमेदवारांना मतदान झाले नाही. देशभर असणारी मोदी लाट, नव्याने वाढलेले ४२,०९० मतदान हे तरुणांचा कल विरोधात आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध नागरिकांचा भावना यांमुळे मतदारसंघात नवखे असणारे जानकर यांनी राष्ट्रवादीला पळता भुई थोडी केली. मागील २००९च्या निवडणुकीत २,७९,५०३ पैकी १,३७,८६२ (४९.३२ टक्के) मतदान झाले होते. सुळेंना ९६,७३७ तर नलावडेंना २५,३५६ मते मिळाली. सुळेंनी ७१,३८१ मतांची आघाडी घेतली होती. या वेळी ३,०५,११८ पैकी १,७९,९५२ (५८ टक्के) मतदान झाले. ४२ हजार (१० टक्के) मतदान वाढले. भोर विधानसभेत सुप्रिया सुळंेना ९०,९१५ तर महादेव जानकरांना ७४,०३० मते मिळाली. सुळेंना १७,१९३ मतांची आघाडी मिळाली. तालुक्यांनुसार मतदान- भोर एकूण मतदान १,४०,९९३, झालेले ८४,८२३ (६० टक्के) सुप्रिया सुळे ४५,८८१ मते, महादेव जानकर ३२,१३९ मते. सुळेंना १३,७४२ची आघाडी. वेल्हे- एकूण ४४,७५४, झालेले २५,६८० (५७.३८ टक्के) सुळे- १३,५३१, जानकर १०,०८०, सुळेंना ३,४५१ मतांची आघाडी. मुळशी- १,१९,३७१, झालेले ६९,४४९ (५८ टक्के). सुळे- ३१,५०३, जानकर- ३१,८११, ३०८ मतांची जानकरांना आघाडी. भोर शहर- सुळे- ३,२०१, जानकर-३,८०५, जानकरांना ६०४ मतांची आघाडी मिळाली. मागील वेळेपेक्षा कमी झालेले मताधिक्य हे राष्ट्रवादीला विचार करायला लावणारे आहे. त्यामुळे आत्मचिंतनाची खरी गरज आहे.