शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

म्हाडाच्या घरांचे विलंब शुल्क झाले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 06:14 IST

व्याज कमी झाल्याने दिलासा : मुंबई मंडळाच्या आगामी लॉटरीपासून नवे दर लागू

मुंबई : म्हाडाच्या घरांच्या किमती ३० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय म्हाडाने याआधीच घेतला आहे. आता या घरांची रक्कम भरण्यास उशीर झाल्यानंतर आकारले जाणारे विलंब शुल्कही कमी केले जाणार आहे. यामुळे म्हाडाच्या लॉटरीतील विजेत्यांना दिलासा मिळेल.

म्हाडाच्या लॉटरीत घर लागल्यानंतर विलंब शुल्कावर आकारण्यात येणाऱ्या ११ टक्के व्याजामुळे विजेत्यांवर मोठा आर्थिक भार पडत होता. मात्र आता हे व्याज कमी करण्यात आले आहे. नवे व्याजदर आगामी मुंबई मंडळाच्या लॉटरीपासून लागू होतील, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यानुसार ११ टक्क्यांऐवजी आता रिझर्व्ह बँकेच्या बेस रेटवर अनुक्रमे ०.५ टक्के, १ टक्के आणि २ टक्के असे व्याज आकारण्यात येईल.

म्हाडाच्या घरांच्या विजेत्यांची पात्रता निश्चिती झाल्यानंतर त्यांना म्हाडाकडून देकार पत्र पाठवले जाते. ते मिळाल्यापासून पहिल्या ४५ दिवसांत घराच्या एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम विजेत्यांना भरावी लागते. तर उर्वरित ७५ टक्के रक्कम म्हाडाकडून दिलेल्या टप्प्यांत भरावी लागते. या टप्प्यांत पैसे भरले नाहीत, तर विजेत्यांच्या हातातून घर निसटू शकते. त्यामुळे विजेत्यांना १९५ दिवसांची मुदत देण्यात येते.

मात्र, मुदतवाढ खिशाला परवडणारी नसते. कारण म्हाडा ७५ टक्के घराच्या रकमेवर ११ टक्के व्याज आकारते. आधी साडेतेरा टक्के व्याज होते. त्यानंतर ते ११ टक्क्यांवर आणले आहे. मात्र ११ टक्के व्याजही भरमसाट असून यामुळे विजेत्यांवर मोठा आर्थिक भार पडतो. त्यामुळे व्याज कमी करावे, अशी मागणी सातत्याने विजेत्यांकडून करण्यात येत होती. ती लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.असे असतील व्याजदरमुदतवाढीच्या पहिल्या १५ दिवसांत कोणतेही व्याज आकारण्यात येणार नाही. त्याच्या पुढच्या ४५ दिवसांत बेस रेट आणि त्यावर ०.५ टक्के असे व्याज आकारण्यात येईल. तर त्यापुढच्या ६५ दिवसांसाठी बेस रेट आणि त्यावर १ टक्के आणि ७५ दिवसांवर बेस रेट आणि त्यावर २ टक्के असे व्याज आकारण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

टॅग्स :mhadaम्हाडाMumbaiमुंबई