शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

केसरकर शिंदेंच्याही पाठीत खंजीर खुपसून भाजपात जातील; राऊतांची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 11:31 IST

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळक्याने आधी आरशात पहावे. शिवसेना ही ठाकरेंची आहे हे कोणीही सांगेल.

दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन गटात संघर्ष सुरु झाला आहे. शिवाजीपार्कवर कोणाची सभा होणार, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून दोन्ही गटांनी अर्ज केले आहेत. त्यातच शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी आपला दसरा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ शिवाजीपार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होण्याची शक्यता आहे. 

यावर देखील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळक्याने आधी आरशात पहावे. शिवसेना ही ठाकरेंची आहे हे कोणीही सांगेल. शिंदेना कोणी ओळखतही नाही, असे राऊत म्हणाले. तसेच केसरकर हे सावंतवाडीच्या मोती तलावातला डोमकावळा आहेत, ते केवळ पदासाठी सत्ते आले आहेत. हा माणूस सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसून निघून जाईल, यामुळे त्यांच्या शिवसेनेत येण्याला आमचा विरोध होता. आता हे  शिंदेंच्याही पाठीत खंजीर खुपसून भाजपात निघून जातील, याची आम्हाला खात्री आहे, अशी टीका राऊत यांनी केली. 

शिंदेंसोबत जे गद्दार गेलेत ते ईडीच्या कथित केसेसच्या भीतीने गेले आहेत. ईडीच्या धाडी विरोधकांवरच का होतात? राहुल कुल, क्रिस्टल घोटाळा यांच्याकडे का टाकल्या जात नाहीत, असा सवालही राऊत यांनी केला आहे. 

दीपक केसरकर म्हणाले कोलापूरच्या जबाबदारीतून मुक्त झालो...माझ्या खांद्यावर कोल्हापूर व मुंबई शहर अशा दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. यातील कोल्हापूरच्या जबाबदारीतून मुक्त झालो आहे. त्यामुळे आता यापुढे मुंबई शहरमध्ये आठवड्यातून तीन दिवस देणार असून उर्वरित तीन दिवस सावंतवाडी मतदारसंघाला देणार असल्याचे केसरकर यांनी काल सांगितले होते.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDeepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे