शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

राज्य शिखर बँकेच्या नफ्यात घट

By admin | Updated: January 9, 2016 04:10 IST

काही वर्षांपूर्वी घोटाळ्यांनी गाजलेली राज्य सहकारी बँक प्रशासक मंडळाने गेल्या वर्षी तब्बल ४१२ कोटी रुपयांनी नफ्यात आणली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या

यदु जोशी,  मुंबईकाही वर्षांपूर्वी घोटाळ्यांनी गाजलेली राज्य सहकारी बँक प्रशासक मंडळाने गेल्या वर्षी तब्बल ४१२ कोटी रुपयांनी नफ्यात आणली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, यंदा या नफ्याला घसरण लागणार असे स्पष्ट दिसत आहे. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांना इतरत्र ठेवी ठेवण्यास दिलेली अनुमती व राज्य बँकेने कमी केलेला व्याज दर याचा हा परिपाक आहे, की प्रशासक मंडळाचे अपयश, असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्य बँकेला २०१३मध्ये ३१५ कोटी, २०१४मध्ये ४०१ कोटी तर २०१५मध्ये ४१२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षात ३१ डिसेंबरपर्यंत हा नफा २२५ कोटी रुपयांचा झाला आहे. गेल्या वर्षीइतका नफा मिळवायचा तर येत्या मार्चपर्यंत उर्वरित तीन महिन्यांमध्ये आणखी १८७ कोटी रुपयांचा नफा राज्य बँकेला मिळवावा लागणार असून, सध्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता हा आकडा गाठणे अशक्य दिसते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या बँकेच्या प्रशासक मंडळात खांदेपालट करीत शासनाने डॉ. एम. एल. सुखदेवे यांची मंडळाच्या अध्यक्षपदी १५ जुलै २०१५ रोजी नियुक्ती केली होती. ए. ए. मगदुम आणि के. एन. तांबे हे मंडळाचे दोन सदस्य आहेत. आघाडी सरकारने नेमलेल्या प्रशासक मंडळाने बँकेला तोट्याच्या गर्तेतून बाहेर काढत नफ्यात सातत्याने वाढ केली. मात्र, नव्या भाजपा सरकारने नेमलेल्या प्रशासक मंडळाच्या कार्यकाळात नफ्यात घसरण झाल्याचे दिसते. गेल्या काही महिन्यांत कर्जबुडव्या सहकारी साखर कारखान्यांच्या संपत्तीची विक्री करण्याचा प्रयत्न राज्य बँक करीत आहे. मात्र, साखर उद्योगातील एकूणच मंदी लक्षात घेता चारवेळा जाहिराती देऊनही कोणी खरेदीसाठी पुढे आलेले नाही. एकदा ही विक्री झाली तर नफा वाढू शकेल, असा बँकेचा होरा आहे. आधीच्या प्रशासक मंडळाने बँकेतील ठेवींवरील व्याजाचा दर ८ टक्क्यांवरून ७ टक्के केला. त्यामुळे ठेवी कमी झाल्या, असे एकीकडे म्हटले जात असले तरी व्याजापोटी बँकेला द्यावयाची रक्कम कमी झाली, असे समर्थनही दिले जात आहे.बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, बँकेची सुस्थिती ही केवळ नफ्याच्या परिमाणावर मोजली जाऊ शकत नाही. बँकेचे भांडवल पर्याप्तता निधीचे प्रमाण २०१३मध्ये १०.६४ टक्के इतके होते. गेल्या वर्षी ते १६.३० टक्क्यांवर गेले आणि यंदा ते १७ टक्क्यांहून अधिक असेल. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत नफा २२५ कोटी रुपये असला तरी शेवटच्या तीन महिन्यांत हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढेल. ठेवी आताच १० हजार ४९० कोटींवर गेल्या आहेत. निव्वळ आणि ढोबळ अनुत्पादित कर्ज (एनपीए) कमी झाले. कर्जवसुली चांगली झाल्याचे हे द्योतक आहे. १० वर्षांनंतर बँकेने सभासदांना पहिल्यांदा लाभांश दिला. राज्य सरकारला १०० कोटी रुपयांच्या भागभांडवलावर बँकेने एकूण २७ कोटी रुपये दिले आहेत.