शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शाळांबाबत १५ दिवसांत निर्णय- आरोग्य मंत्री राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 09:21 IST

टास्क फोर्स राज्याचा आढावा घेणार

जालना : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना शिक्षक संघटना आणि विशेष करून इंग्रजी शाळाचालकांकडून शाळा बंदच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली जात आहे. या महत्त्वाच्या निर्णयाबाबत आगामी पंधरा दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातील रुग्णवाढीचा वेग आणि तेथील उपाययोजनांचा आढावा घेऊन नंतर या शाळा सुरू करण्यासाठी विचार होऊ शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी येथे माध्यमांशी बोलताना दिली.  टोपे म्हणाले की, शाळांचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत रुग्णवाढीचे गुणोत्तर हे तुलनेने आज तरी जास्त दिसत आहे; परंतु यामुळे रुग्ण गंभीर होत नसल्याने ही एक समाधानकारक बाब म्हणावी लागेल. शाळा नव्याने सुरू करण्यासाठी आताच घाई करून चालणार नाही. बंद करण्याचा निर्णयदेखील सर्वांनी मिळून घेतला होता. त्यामुळे नव्याने सुरू करण्यावरही टास्क फोर्स तसेच अन्य वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येत आहे.  ज्या गावांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे, त्या गावांमध्येही केवळ ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत त्या सुरू करता येतील, अशी शक्यता टोपे यांनी अत्यंत सावध व्यक्त केली.  

त्रिसूत्री प्रभावीपणे राबविण्याची गरज   रविवारी लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आता लसीकरणाबाबत जागृती वाढली असून, एक आणि दोन डोस घेतलेल्यांची संख्या आता लक्षणीय आहे. ती आणखी वाढविण्यासाठी आपण केंद्राकडे जादा डोसची मागणी केली असल्याचे टोपे म्हणाले. एकूणच ओमायक्रॉनचा धोका टळलेला नाही. कोरोनाची त्रिसूत्री आणखी प्रभावी राबविण्याची गरज असून, गर्दी टाळण्याचे आवाहनही टोपे यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपे