शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

‘शिवभोजन’ थाळीचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात, योजना सुरू ठेवण्याबाबत सरकार सकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:02 IST

सर्वपक्षीय नेत्यांच्या आग्रही मागणीचा फेरविचार

संदीप आडनाईककोल्हापूर : लाडक्या बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी शिवभोजन थाळी बंद करण्याच्या शासनाच्या हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात काँग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांनी ही योजना बंद न करण्याची मागणी केली आहे. राज्यातील केंद्रचालकांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांनी ही योजना बंद न करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले असले, तरी यासंदर्भातील निर्णय मार्चमध्ये होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होणार आहे.गरीब मजूर, कामगारांची उपासमार टाळण्यासाठी शासनाने १० रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली. कोरोनाकाळात ही थाळी मोफत दिली जात होती. या थाळीसाठी केंद्रचालकांना देण्यात येणारे ४० रुपयांचे अनुदान महागाईमुळे अपुरे पडत आहे. त्यातच लाडक्या बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडला आहे.ही योजना बंद केल्यास हा भार कमी होणार आहे; परंतु महाराष्ट्र राज्य शिवभोजन चालक संघटनेचे अध्यक्ष किशोर आयरेकर, उपाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शिवभोजन चालक मंत्रालयावर एकवटले. लातूरच्या दिव्यांग चालक रंजना कांबळे यांच्या हस्ते ही योजना बंद करू नये, यासाठीचे निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिले. छगन भुजबळ यांच्यासह सर्व पक्षांच्या नेत्यांनीही विनंती केल्याने सरकार ही योजना बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करत आहे.

  • शिवभोजन योजना सुरू : २६ जानेवारी २०२०
  • एकूण शिवभोजन केंद्र : १९०४
  • थाळीतील पदार्थ : २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी वरण, १ मूठ भात.
  • मंजूर थाळ्या : १८,८३,९६,२५४ (२७ मार्च २०२४ अखेर)
  • वाटप थाळ्या : १,८०,६४४
  • योजनेची मर्यादा : १,९९,९९५ थाळ्या
  • सध्याचे लाभार्थी : २,००,००० प्रतिदिन
  • मिळणारा रोजगार : ३०,००० कर्मचारी
  • प्रतिथाळी मिळणारे सरकारी अनुदान : ४० रुपये
  • लाभार्थीकडून : १० रुपये
  • वार्षिक खर्च : २६७ कोटी रुपये.

शासनाने काही निर्बंध घातले तरी चालतील; परंतु ही योजना बंद करू नये, अशी आमची मागणी आहे. शासनाला गरिबांचे आशीर्वाद देणारी ही योजना आहे. - किशोर आयरेकर, महाराष्ट्र राज्य शिवभोजन चालक संघटना.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshiv bhojnalayaशिवभोजनालयBudgetअर्थसंकल्प 2024Governmentसरकार