शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समितीच्या अहवालानंतरच जुन्या पेन्शनचा निर्णय;  शिक्षक संघटनांचा पाठपुरावा सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 06:30 IST

राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर व तुकड्यांवर नियुक्त सुमारे २५ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरात विविध संघटनांकडून आंदोलने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर व तुकड्यांवर नियुक्त व २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाने १९८२ ची जुनी पेन्शन योजना तातडीने जाहीर करावी, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून होत आहे. तथापि, या संदर्भात अभ्यासासाठी नियुक्त समितीच्या अहवालानंतरच सकारात्मक निर्णय होऊ शकणार आहे. शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी १० जून रोजी राज्याच्या वित्त सचिवांची भेट घेऊन केलेल्या चर्चेतून हे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर व तुकड्यांवर नियुक्त सुमारे २५ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरात विविध संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय सभापतींनी दिलेल्या निर्देशानुसार उपरोक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी २४ जुलै २०१९ ला एक संयुक्त समिती गठीित करण्यात आली; परंतु दोन वर्षे उलटत आले तरी समितीचा अभ्यास अद्याप पूर्ण झालेला नाही. या संदर्भात शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी १० जून रोजी राज्याच्या वित्त सचिवांची भेट घेत शासनाने तातडीने जुनी पेन्शन जाहीर करण्याची मागणी केली आहे.

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विद्यमान शासनाने तातडीने जुनी पेन्शन जाहीर करावी अशी मागणी केली. यावेळी वित्त सचिवांनी चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत अभ्यास समितीच्या अहवालानंतर २००५ पूर्वीच्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक धोरण असल्याचे सूतोवाच केले.

वित्त सचिवांचे सूतोवाच१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व कर्मचारी तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने जुनी पेन्शन जाहीर करावी अशी मागणी केली असता वित्त सचिवांनी चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक धोरण असल्याचे सूतोवाच केले. 

टॅग्स :Teacherशिक्षक