मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या संदर्भात मेरिटवर निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना सांगितले. आयपीएलचे वादग्रस्त माजी अध्यक्ष ललित मोदींची लंडनमध्ये भेट घेतल्याप्रकरणी अडचणीत आलेले मारिया यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी खुलासा मागविला होता. मारिया यांनी तो गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी.बक्षी यांच्याकडे दिला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, मारिया यांच्याबाबत आपण अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यांना क्लिनचिट दिली असल्याच्या वृत्तात तथ्य नाही. आपण मेरिटवर निर्णय घेऊ. दरम्यान, मारिया यांनी दिलेला अहवाल अतिरिक्त मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तो खुलासा समाधानकारक असल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)
मारियांबाबत मेरिटवर निर्णय-मुख्यमंत्री
By admin | Updated: June 24, 2015 01:55 IST