शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंच्या हकालपट्टीचा निर्णय योग्य - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 18:12 IST

आज सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत समितीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. 

ठळक मुद्देसमितीने घेतलेला निर्णय योग्य येत्या आठ दिवसात कार्यकारिणीची बैठकसत्तेतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेतआरोपांमुळे संघटनेची बदनामी

कोल्हापूर, दि. 7 - गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष उघडपणे दिसून आहे. आज सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत समितीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. राजू शेट्टी म्हणाले, सदाभाऊ खोत यांच्या संबंधी निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या समितीला पूर्ण अधिकार देण्यात आले होते. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत समितीने घेतलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे शेतकरी संघटनेवर किंवा चळवळीवर कोणताही परिणाम होणार नाही. याचबरोबर येत्या आठ दिवसात कार्यकारिणीची बैठक आहे. आजच्या समितीने घेतलेल्या निर्णयावरुन आम्ही कार्यकारिणीच्या बैठकीत काय निर्णय घेऊ, हे तुम्हीच समजून घ्या. यापुढे राजू शेट्टी म्हणाले, सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद आणि आमदारकी दोन्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळेच मिळाले आहे. या दोन्ही गोष्टींचा निर्णय सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात येईल. याचबरोबर, राजू शेट्टी यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

सदाभाऊ खोतांची हकालपट्टी...कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी संघटनेविरोधात भूमिका मांडत असल्याने त्यांना संघटनेत ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सदाभाऊ खोत यांची चौकशी केल्यानंतर त्यांची आज संघटनेतून हकालपट्टी केली. 

आरोपांमुळे संघटनेची बदनामी...आजवर सदाभाऊ खोत यांनी केलेले काम लक्षात घेता आणि त्यांच्यावर गेल्या काही दिवसांत झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांची समितीने हकालपट्टीचा करण्याचा निर्णय घेतवा आहे. त्यांच्यावर होणा-या आरोपांमुळे संघटनेची बदनामी होत आहे, स्वाभिमानी सदस्य समितीचे दशरथ सावंत यांनी सांगितले.