शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

७ आॅगस्टपर्यंत निर्णय घ्या!...तर क्रांतीदिनापासून राज्यभरात ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 01:52 IST

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांवर ७ आॅगस्टपर्यंत निर्णय घ्या, अशी डेडलाईन परळी (जि. बीड) मराठा क्रांती मोर्चाने शासनाला गुरुवारी दिली.

मुंबई : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांवर ७ आॅगस्टपर्यंत निर्णय घ्या, अशी डेडलाईन परळी (जि. बीड) मराठा क्रांती मोर्चाने शासनाला गुरुवारी दिली. मुदतीत निर्णय न झाल्यास ९ आॅगस्टपासून राज्यभर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, राज्यात गुरुवारी देखील ठिकठिकाणी आंदोलन झाले.परळीतील ठिय्या आंदोलन सोळाव्या दिवशीही सुरू आहे. आंदोलनस्थळी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक झाली. त्यानंतर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या. य्या बैठकीस पुण्याचे आबासाहेब पाटील यांच्यासह नानासाहेब जावळे, महेश डोंगरे (सोलापूर), विवेकानंद बाबर (सातारा), संजय सावंत (औरंगाबाद), सुनील नागणे (तुळजापुर) आदी उपस्थित होते.मराठा आरक्षण व आंदोलनासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती बरखास्त करावी. तसेच सर्व मागण्यांचे नियोजन मुख्यमंत्र्यांनी परळी या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या ठरावासोबत लेखी द्यावे, तरच आंदोलन स्थगित करण्यात येईल, असे स्पष्टीकरण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले. अहमनदगरमध्येही बैठक होऊन असाच निर्णय झाला. बैलगाडी, ट्रॅक्टर गुराढोरासंह मराठा समाज बांधव ९ आॅगस्टला ठिय्या आंदोलन करणार आहेत.पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्यापुण्यात पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या कार्यालय आणि निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.औरंगाबाद - जळगाव महामार्गावरील फुलंब्रीजवळ पाल फाटा येथे दीड तास रास्ता रोको केला.आंदोलकांनी माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.मराठा तरुणाबरोबर एका दलित तरुणानेही शोले स्टाईल आंदोलन केले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण