शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

5 लाखांच्या विम्यासाठी डिसेंबरचा मुहूर्त; कंपनीच्या निविदा प्रक्रियेमुळे विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 07:21 IST

२७ जुलैला सार्वजनिक आरोग्य विभागाने या संदर्भातील निर्णय जाहीर केला. त्यामध्ये  राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी योजना असून, सर्व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांनाही ती लागू केली गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शासनाने दोन महिन्यांपूर्वी राज्यभरासाठी  महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू होणार, असे जाहीर केले होते. मात्र, अद्यापही याबाबत कुठल्याही प्रकारच्या सूचना रुग्णालयांना न मिळाल्याने ही योजना कधी लागू होणार, हा विषय सध्या चर्चेचा झाला आहे. या योजनेची अंमलबाजवणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे आहे. मात्र, याकरिता विमा देणाऱ्या नवीन कंपनीच्या निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू असून, ते काम पूर्ण होऊन डिसेंबर महिन्यात  ही योजना लागू होणार असल्याची माहिती सोसायटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली.    

२७ जुलैला सार्वजनिक आरोग्य विभागाने या संदर्भातील निर्णय जाहीर केला. त्यामध्ये  राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी योजना असून, सर्व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांनाही ती लागू केली गेली आहे. या योजनेंतर्गत उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच देण्यात आले  आहे. विशेष म्हणजे, राज्यातील १००० रुग्णालयांचा यात सहभाग असून, आजाराची संख्या ९९६ वरून १३५६ इतकी केली. 

सध्याच्या अस्तित्वात असलेल्या या योजनेसाठीचा सोसायटीकडून प्रीमियम युनायटेड इन्शुरन्स कंपनीला एका कुटुंबाकरिता ८५५ रुपये इतका सरकारतर्फे दिला जातो. त्याकरिता शासन वर्षाला या कंपनीला १७७० कोटी वर्षासाठी देते. महाराष्ट्र आरोग्य पाहणी अहवालानुसार २ कोटी २२ लाख या योजनेसाठी लाभार्थी ठरलेले आहे. एक कुटुंब म्हणजे ४ ते ५ व्यक्तींना हा लाभ मिळू शकतो.

जी पाच लाखांची नवीन योजना आहे. त्यामध्ये विमा कवच हे पाच लाख केले असून, त्यामध्ये आजाराची संख्या वाढविली आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांना ही योजना लागू केली आहे. त्यामुळे आता हे इन्शुरन्स कंपनीला द्यावा लागणार प्रीमियम बदलणार आहे. आता नवीन इन्शुरन्स कंपनी शोधून त्यांना सध्याच्या नवीन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणि कवच याची माहिती देऊन प्रीमियम द्यावा लागणार आहे. त्यामुळे नवीन कंपनीसाठी निविदा प्रक्रियेचे काम सुरू केले आहे. नोव्हेंबर महिन्यात हे काम पूर्ण करणार आहोत. जर सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या तर डिसेंबर महिन्यात ही योजना लागू होईल.   -मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी 

टॅग्स :Healthआरोग्य