शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१ डिसेंबरला मराठा आरक्षण ही शुद्ध फसवणूक, शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 08:06 IST

मराठा व ओबीसी समाजांत दुही निर्माण करून निवडणुका जिंकण्याचे मुख्यमंत्र्यांचे दिवास्वप्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

कोल्हापूर : एक डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ही शुद्ध फसवणूक आहे. मराठा व ओबीसी समाजांत दुही निर्माण करून निवडणुका जिंकण्याचे मुख्यमंत्र्यांचे दिवास्वप्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. एक डिसेंबर ही तारीख आता फार लांब नाही; त्यामुळे किती जल्लोष होतो हे पाहूच, असा टोलाही पवार यांनी लगावला.नातेवाईकांच्या विवाहानिमित्ताने पवार सहकुटुंब गुरुवारपासून कोल्हापुरात आहेत. दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मराठा आरक्षणासंबंधी मुख्यमंत्री स्वच्छपणे कोणतीही माहिती देत नाहीत. कुणाचे तरी काढून घेऊन हे आरक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातून मराठा विरुद्ध ओबीसी किंवा अन्य घटक यांच्यात वाद निर्माण करण्याची मुख्यमंत्र्यांची नीती आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने हे फार घातक आहे. त्याचा परिणाम राज्याच्या एकतेवर होईल.सरकारची ही पावले सामाजिक अभिसरण व मन उद्ध्वस्त करणारी आहेत. त्यांनी एक डिसेंबरला जल्लोष करण्याची केलेली घोषणा त्याचहेतूने केली आहे. सर्वच समाजांतील गरीब घटकांना आरक्षण देण्याची गरज आहे.राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी होण्यात कोणतीच अडचण नाही. लोकसभेच्या ४१ जागांचे वाटपही झाले आहे. उर्वरित सहा-सात जागांबाबत काही आक्षेप आहेत. ते आम्ही एकत्र बसून संपवू, असे पवार यांनी यासंबंधीच्या प्रश्नावर स्पष्ट केले.राणे, लोकसभा आणि राष्ट्रवादी..!माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवणार असल्याच्या बातम्या दिल्याबद्दल वृत्तपत्रांचे मिश्कीलपणे आभार व्यक्त करून पवार म्हणाले, ‘कोकणातील रायगडची एकच जागा आमच्या पक्षाकडे आहे. दुसरी काँग्रेसकडे आहे आणि राणे हे भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे खासदार झाले असल्याने ते पुन्हा लोकसभा लढवतील असे मला वाटत नाही.’

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस