शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीत सावळागोंधळ; एकच आधार आणि बँक अकाऊंट नंबर असलेले लाखो लाभार्थी शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 11:07 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती समोर येत आहे. एकच आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले शेकडो लाभार्थी असल्याचं निदर्शनास आलं आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती समोर येत आहे. एकच आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले शेकडो लाभार्थी असल्याचं निदर्शनास आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे.  राज्यातील बँक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

मुंबई- शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती समोर येत आहे. एकच आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले शेकडो लाभार्थी असल्याचं निदर्शनास आलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे.  राज्यातील बँक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दिवाळीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात ८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीतील गोंधळाची परिस्थिती आता समोर येत आहे. एकच आधार कार्ड क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले लाखो लाभार्थी या यादीत आहे. उदाहरणासाठी, दिलीप काचळे या शेतकऱ्याचा आधार क्रमांक 111111110157 आणि बँक अकाऊंट नंबर 111111111111 आहे. तर बाळकृष्ण रामघंगाळी यांचाही आधार कार्ड क्रमांक  111111110157 आणि बँक अकाऊंट नंबर 111111111111  आहे. अशा शेकडो लाभार्थ्यांचे आधार आणि बँक अकाऊंट नंबर एकच असून यामुळे राज्य सरकारसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. आम्हाला एकच आधार आणि बँक अकाऊंट नंबर असलेले लाभार्थी बघून आश्चर्याचा धक्का बसला. शेकडो लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर एकच असणं, हे आम्हाला विचारात टाकण्यासारखं आहे, असं . माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही के गौतम यांनी म्हंटलं आहे.

याशिवाय एकाच शेतकऱ्याच्या नावाने सहा कर्ज खाती आणि एका शेतकऱ्याचं नाव एकाच यादीत तीन वेळा असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण गोंधळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती याआधीही समोर आली आहे.  उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील शेतकरी भारत तांबे यांनी 1 लाख 40 हजार रुपयांच्या कर्जमाफीसाठी अर्ज केलेला असताना त्याला फक्त 10 हजार रुपयाच्या कर्जमाफीचं प्रमाणपत्र देण्यात आलं. दुसरीकडे राज्य सरकारने 89 लाख शेतकऱ्यांचे 34 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात कर्जमाफीचा आकडा 20 हजार कोटी रुपयांच्या जवळपासच राहील, असा अंदाज आहे.