शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

२७ लाख शेतकऱ्यांना ३० हजार कोटींची कर्जमाफी

By admin | Updated: June 4, 2017 06:22 IST

राज्यातील पाच एकरपर्यंत शेतजमीन असलेले अल्पभूधारक आणि कर्ज थकीत असलेल्या २७ लाख शेतकऱ्यांचे ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची दिलासादायक

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील पाच एकरपर्यंत शेतजमीन असलेले अल्पभूधारक आणि कर्ज थकीत असलेल्या २७ लाख शेतकऱ्यांचे ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची दिलासादायक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शेतकरी संप मागे घेतल्याची घोषणा आंदोलकांच्या कोअर कमिटीने केली. ही कर्जमाफी येत्या ३१ आॅक्टोबरपूर्वी अमलात येईल, हा माझा शेतकऱ्यांना शब्द आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ‘योग्य वेळी कर्जमाफी देऊ’ अशी भूमिका आपण आधीपासूनच घेतली होती. राज्याच्या तिजोरीवर या कर्जमाफीचा ताण पडणार असला तरी शासन तो सहन करेल पण आपला शब्द पाळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी लोकमतशी बोलताना दिली. सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. मात्र, नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा देणारे काही निर्णय घेतले जातील, असे ते म्हणाले. ज्या २७ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे त्यातील १५ लाख शेतकरी हे २०१२-१३ या दुष्काळी वर्षातील थकबाकीदार आहेत. कायद्याने त्यांच्या कर्जाची आज फेररचना होऊ शकत नाही. अशा वेळी त्यांना कर्जमाफी देऊन दिलासा देणे आवश्यक होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. वर्षा निवासस्थानी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता संपकरी शेतकऱ्यांची कोअर कमिटी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरू झाली आणि ती पहाटे ५ ला संपली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेही उपस्थित होते. कर्जमाफी संदर्भात एक समिती स्थापन करून या कर्जमाफीचे प्रारूप व कार्यपद्धती ठरविली जाईल. या समितीमध्ये शेतकऱ्यांचेही प्रतिनिधी असतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल खरेदी करणे हा गुन्हा ठरविणारा कायदा विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात करण्यात येईल. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. या शिवाय राज्य कृषिमूल्य आयोग एक महिन्यात गठीत करण्यात येणार आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी पुढील आश्वासने दिली -कृषी वीजदराचा फेरविचार केला जाईल. जुन्या थकित वीज बिलासंदर्भात दिलासा देणारी योजना तयार केली जाईल. गोदामे, शीतगृह, वेअरहाऊसेसची साखळी वाढविण्यासाठी राज्य शासन जोरकस प्रयत्न करेल.गुन्हे मागे घेणारसंपादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यात येतील. परंतु ज्यांनी केवळ हिंसा केली आणि जे शेतकरी नाहीत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येणार नाहीत. या आंदोलनादरम्यान अशोक मोरे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. सरकारतर्फे त्यांच्या कुटुंबीयांना मदत देणार.२० जूनपर्यंत दूधदरवाढ दुधाचे दर वाढविण्यास राज्य शासन तयार आहे. २० जूनपर्यंत यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. दुधाचे दर वाढविण्यासंदर्भात नियामकाची (रेग्युलेटर) नियुक्ती करण्याची शक्यता पडताळून पाहण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी चर्चेत स्पष्ट केले.जमीनमर्यादेची अट लवचीक५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला तरी त्यापेक्षा काही गुंठे जमीन जास्त असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी दिली जाईल. विदर्भात अशा जमिनी अधिक आहेत. तांत्रिक कारणाने अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी अडविली जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. देशात कोणतेही राज्य सरसकट कर्जमाफी देत नाही. महाराष्ट्रात यापूर्वी कोणत्याही सरकारने ती दिलेली नाही. आम्ही २७ लाख शेतकऱ्यांना देत असलेली ३० हजार कोटींची कर्जमाफी ही राज्यातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी असेल. असे असताना सरसकट कर्जमाफीच्या नावाखाली काही जणांना राज्यात अराजक माजवायचे आहे. त्यामुळे ते लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना प्रतिसाद मिळेल, असे मला वाटत नाही. - देवेंद्र फडणवीसकर्जमाफी देणे, दुधाचे भाव वाढविणे यासह विविध मागण्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठोस आश्वासन दिल्याने संप मागे घेण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतला आहे. - जयाजी सूर्यवंशी, सदस्य, कोअर कमिटीफूट पाडण्याचा प्रयत्न - अशोक चव्हाणनांदेड : पोकळ आश्वासने आणि पुढच्या तारखा देवून शेतकऱ्यांची सरकारने बोळवण केली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, असे सांगून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.