शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

कर्जमाफीची आकडेमोड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 01:00 IST

कर्जमाफीसाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातून माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि पीककर्जासह एकूण

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कर्जमाफीसाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातून माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि पीककर्जासह एकूण कर्जाची रक्कम एकत्रित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कर्जमाफीचा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ होईल, असे सध्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे ‘तत्वत:’ मान्यता दिली आहे़ त्यामुळे या शासनाला मी ‘तत्वत:’ धन्यवाद देतो़ शासनाचा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यासाठी जी पावले उचलायला पाहिजे, ती उचलली नसल्याचे कृषीतज्ञ आणि शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीचे सदस्य डॉ़ बुधाजीराव मुळीक यांनी पुण्यात सांगितले़ कर्जमाफीची घोषणा केली असली तरी शासनाने केवळ पीककर्ज की मुदत कर्ज माफ केले हे स्पष्ट केलेले नाही़ अनेकांनी ग्रीन हाऊस, यमू पालन, लिफ्टसाठी मुदत कर्ज घेतले आहे़ त्यांना माफी मिळणार का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही़ याशिवाय डेअरी, पोल्ट्री, मासेपालन, रेशीम उद्योग यांनाही त्याचा लाभ मिळणार का हेही स्पष्ट झाले नाही, असेही डॉ मुळीक यांनी सांगितले. कोल्हापूरात २५० कोटींची कर्जमाफी शक्यकोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार असून २५२ कोटींची थकबाकी माफ होणार आहे. सांगली जिल्ह्याची थकबाकी १८०० कोटीचीसांगली जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व जिल्हा बँकेकडून मार्च २०१७ पर्यंत ९४७ कोटीचे पीककर्ज थकीत आहे, सातारा जिल्ह्यात १५४.३१ कोटींचे पीककर्ज थकीतमार्च २0१७ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत २ हजार ६८४ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप झाले आहे. यापैकी १५४ कोटी ३१ लाखांचे कर्ज थकीत आहे. खान्देशात १,३४३ कोटींची कर्जमाफीखान्देशात दोन लाख ९१ हजार शेतकऱ्यांचे १,३४३ कोटी रुपयांचे कर्जमाफ होऊ शकते. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ लाख ६० हजार ९८३ अल्पभूधारक खातेदारांना नव्या निर्णयाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.नगर जिल्ह्याला ९५९ कोटींची कर्जमाफी शक्यअहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना ९५९ कोटी रुपयांच्या पीक कर्ज माफीचा फायदा मिळू शकेल.सिंधुदुर्गात ८ टक्के थकबाकीदारसिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २०१६ मध्ये सुमारे ४० हजार शेतकऱ्यांना विविध बँकामार्फत २०७ कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. या कर्ज वाटपात जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा होता. त्या वेळेस सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत ११० कोटी रुपयांचे पीक कर्ज देण्यात आले होते. यातील तब्बल ९२ टक्के शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली आहे. रत्नागिरीत ८५ टक्के कर्जआंबा बागायतीसाठी रत्नागिरीत तब्बल ५००कोटींची आवश्यकता भासणार आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बँक आॅफ इंडिया यांच्याकडून एक लाख १९ हजार लाभार्थ्यांनी कर्ज घेतले आहे. यातील ८५ टक्के कर्ज आंबा बागायतीसाठी घेतलेले असून, बहुतांश कर्जदार अल्पभूधारकच आहेत.