शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

डेब्रिज माफियांचा शेतकरी कुटुंबावर हल्ला

By admin | Updated: April 8, 2017 04:11 IST

अडवली भुतावलीमध्ये डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी स्थानिक शेतकरी कुटुंबावर डंपर चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला

नामदेव मोरे,नवी मुंबई- अडवली भुतावलीमध्ये डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी स्थानिक शेतकरी कुटुंबावर डंपर चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नशिबाने वाचलेल्या कुटुंबाने तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. सकाळी १२ वाजता अनधिकृत भराव करणारा डंपर पकडून व अधिकाऱ्यांना फोन करूनही एकही अधिकारी तिकडे फिरकला नसल्याने डेब्रिजविरोधी पथकाचाच माफियांना पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. खैरणे-बोनकोडे येथे राहणारे विजय नाईक यांची अडवली गावच्या हद्दीमध्ये वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या परिसरातील बहुतांश जमीन मोठ्या उद्योगपतींनी विकत घेतली आहे. ज्यांनी जमीन विकली नाही त्यांनाही ती विकण्यास भाग पाडली आहे. नाईक परिवारालाही जमीन विकण्यासाठी अनेकांनी संपर्क साधला होता; परंतु आमची वडिलोपार्जित जमीन असून आम्ही ती विकणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. यामुळे नाईक कुटुंबीयांच्या जमिनीच्या चारही बाजूला डेब्रिज माफियांच्या मदतीने अनधिकृतपणे डेब्रिज टाकण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांमध्ये जवळपास दहा हजार डेब्रिज येथे खाली झाले असून मुंबई, ठाणेमधील बांधकामाच्या कचऱ्याचा नवीन डोंगर तयार झाला आहे. नाईक कुटुंबीयांचे शेतघरही उद्ध्वस्त करण्यात आले आहे. त्यांच्या जमिनीकडे जाण्यास रस्ताच बंद करण्यात आला आहे. याविषयी दोन वर्षांपासून पालिकेकडे तक्रारी केल्या जात आहेत. या तक्रारींची दखल घेतली जात नाही. वारंवार पत्र दिल्यानंतरही डेब्रिजमाफिया बिनधास्तपणे भराव टाकत असून त्यांना राजकीय व प्रशासकीय आश्रय मिळत आहे. शेतकरी नाईक कुटुंबीयांनी एक आठवड्यापूर्वी परिमंडळ दोनच्या डेब्रिज विरोधी पथकाला घटनास्थळी नेवून तेथील स्थिती दाखविली. यानंतरही भराव थांबला नाही. शुक्रवारी डेब्रिजचा भराव सुरू असताना विजय नाईक, त्यांचा मुलगा दर्शन व अमोल नाईक, सून मोनिका अमोल नाईक यांनी १२ वाजता डेब्रिजची गाडी अडविली. ज्या डंपरमधून वाहतूक सुरू होती त्यांना गोठेघर येथे मध्ये डेब्रिज टाकण्याची परवानगी आहे. गोठेघर हे फक्त नावासाठी असून प्रत्यक्षात डेब्रिज अडवलीच्या हद्दीमध्ये टाकले जात आहे. नाईक परवानाने डंपर अडविल्यानंतर परवानगीवरील फोननंबरवर संपर्क साधला; पण प्रत्यक्षात ते नंबरच चुकीचे असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर सायंकाळपर्यंत कोणीही आले नाही. डंपरचालकाने डंपर नाईक परिवारावर चालविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दर्शन नाईक जखमी झाला आहे. सायंकाळी उशिरा पालिकेचे पथक आले; पण त्यांनी डंपरवर कारवाई केली नाही. चालक चावी घेऊन पळून गेला असल्याचे कारण देण्यात आले. डेब्रिज माफियाच्या हल्ल्यात नाईक परिवारातील सदस्यांचा मृत्यू झाला असता तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. माफियांना अभय देणारे पथक महापालिकेचे डेब्रिज विरोधी पथक हे प्रत्यक्षात डेब्रिज माफियांना अभय देणारे पथक बनले आहे. दोन वर्षे पाठपुरावा करूनही गांभीर्याने कारवाई कधीच करण्यात आलेली नाही. शुक्रवारी विजय नाईक व त्यांच्या परिवाराने जीव धोक्यात घालून डंपर अडविला. अधिकाऱ्यांना फोन केला असता, माझी पत्नी अजारी आहे, तीला दवाखान्यात घेऊन जायचे असल्याचे सांगितले. पत्नी अजारी असताना अधिकाऱ्यांनी सुट्टी का घेतली नाही व कर्तव्यावर असताना कारवाई न करता खासगी कामे करण्यावर का लक्ष देण्यात आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पथकामधील एक जबाबदार अधिकाऱ्याने गाडी नसल्याचे कारण देऊन कारवाई केली नाही यामुळे डेब्रिज माफियांना या पथकाचेच संरक्षण असल्याचे सिद्ध झाले आहे. आमच्या शेतजमिनीच्या बाजूच्या भूखंडावर दोन वर्षांपासून भराव सुरू आहे. आम्ही तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. आमचे शेतघर पाडले आहे. शुक्रवारी डंपर अडविल्यामुळे माफियांनी कुटुंबीयांवर डंपर चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भावाच्या पायावरून डंपरचे चाक केले. आमचा जीव गेल्यानंतर पालिका प्रशासन माफियांवर कारवाई करणार का ?- अमोल नाईक, शेतकरी, अडवलीखैरणे-बोनकोडे येथे राहणारे विजय नाईक यांची अडवली गावच्या हद्दीमध्ये वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या परिसरातील बहुतांश जमीन उद्योगपतींनी विकत घेतली आहे. ज्यांनी जमीन विकली नाही त्यांनाही ती विकण्यास भाग पाडली आहे.