औरंगाबादेत जळालेल्या महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: June 23, 2016 17:33 IST2016-06-23T17:33:38+5:302016-06-23T17:33:38+5:30

राहत्या घरी जळालेल्या महिलेचा उपचार सुरू असताना घाटी रुग्णालयात २२ जून रोजी रात्री मृत्यू झाला.

The death of a woman who died in Aurangabad | औरंगाबादेत जळालेल्या महिलेचा मृत्यू

औरंगाबादेत जळालेल्या महिलेचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 23 -  राहत्या घरी जळालेल्या महिलेचा उपचार सुरू असताना घाटी रुग्णालयात २२ जून रोजी रात्री मृत्यू झाला.
वैशाली मच्छिंद्र जाधव(२८,रा.भीमनगर, भावसिंगपुरा)असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, भीमनगर येथील रहिवासी वैशाली जाधव ही महिला २१ जून रोजी रात्री १० वाजता स्वत:च्या घरी स्वयंपाक करीत असताना भाजली. त्यानंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचार सुरू असताना आज रात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. छावणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The death of a woman who died in Aurangabad