शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

विष प्राशन केलेल्या दोन चिमुकलींसह मातेचाही मृत्यू

By admin | Updated: October 2, 2016 18:09 IST

एकापाठोपाठ दोन मुली झाल्यानंतर तुला मुलगा होत नाही,असे म्हणत सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरवात केली. हा छळ असह्य झाल्याने विवाहितेने शनिवारी सकाळी

 ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद. दि. 2- आजच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत. असे असले तरी आजही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा अट्टाहास केला जातो.अशाच एका घटनेत एका विवाहितेला एकापाठोपाठ दोन मुली झाल्यानंतर तुला मुलगा होत नाही,असे म्हणत सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरवात केली. हा छळ असह्य झाल्याने विवाहितेने शनिवारी सकाळी ४ आणि  २ वर्ष वयाच्या चिमुकलींना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केले. या मायलेकींचा उपचार सुरू असताना रविवारी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास औरंगाबाद तालुक्यातील महालपिंप्री येथे घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निता सतिश भोळे (२२) , दिव्या सतीश भोळे(४) आणि दिप्ती सतीश भोळे(२)अशी मायलेकींची नावे आहेत. पती सतीश गोविंद भोळे, सासू सुलाबाई, भाया संतोष आणि जाऊ आम्रपाली अशी आरोपींची नावे आहेत.  पोलिसांनी सतीश आणि  संतोष यांना अटक केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलिस आणि निताच्या नातेवाईकांनी सांगितले की, मुकुंदवाडीतील  प्र्रकाशनगर येथे माहेर असलेल्या नीताचा विवाह २१ फेब्रुवारी २०११ रोजी महालपिंप्री येथील सतीशसोबत  झाला.   नीताला एकापाठोपाठ दिव्या आणि दिप्ती या दोन मुली झाल्या आहेत. लग्नानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर आरोपींकडून  घर बांधण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी तिचा छळ सुरू झाला. तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पहिल्या मुलीनंतर दोन वर्षापूर्वी तिला दुसरीही मुलगी झाल्याने आरोपींकडून तिच्या छळ अधिक वाढला. तुला मुलगा होत नाही, आम्हाला वंशाला दिवा पाहिजे, असे म्हणून आरोपींनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देणे सुरूच ठेवले.  विशेष म्हणजे पती, सासू आणि भाया व जाऊ हे सुद्धा तिला टोमणे मारत असत. पतीसह चार जणांविरोधात गुन्हादरम्यान याप्रकरणी नीताचे वडिल गोपीनाथ मगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चिकलठाणा पोलीस ठाण्यात नीताच्या पतीसह, भाया, सासू आणि जाऊ यांच्याविरोधात नीताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सतिश आणि संतोष भोळे यांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास फौजदार ए.पी.लोखंडे करीत आहे.अखेर तिने मृत्यूला कवटाळलेत्रास अस' होत असल्याने नीताने  स्वत:चे जीवन संपविण्याचे ठरवले. मात्र आपल्या पश्चात आपल्या दोन्ही चिमुकलींचे काय होईल,ही चिंता तिला सतावत होती. शेवटी तिने शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन्ही चिमुकलींना विष पाजले आणि स्वत:ही विषाची बाटली तोंडाला लावली. दोन्ही चिमुकलींना विष पाजून नीताने विष प्राशन केल्याचे समजताच भाया आणि पतीने त्यांना घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना एकापाठोपाठ तिनही मायलेकींचा मृत्यू झाला.