शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

मरण हे मरून गेलेले असल्याने आता पोलीस संरक्षणाची गरज नाही - अण्णा हजारे

By admin | Updated: March 6, 2016 19:33 IST

वनात वयाच्या 26 व्या वर्षीच जो पर्यंत जगेल तो पर्यंत माझे गाव, समाज आणि देशाची सेवा करील आणि ज्या दिवशी मरेल त्या दिवशी गाव, समाज आणि देशाची सेवा करता करताच मरेल हे व्रत घेतले.

अण्णा हजारे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढह्ण वर्तमान पत्रातील दिनांक 05.03.2016 ची बातमी वाचून दुःख झाले. जीवनात वयाच्या 26 व्या वर्षीच जो पर्यंत जगेल तो पर्यंत माझे गाव, समाज आणि देशाची सेवा करील आणि ज्या दिवशी मरेल त्या दिवशी गाव, समाज आणि देशाची सेवा करता करताच मरेल हे व्रत घेतले. समाज व देशाची सेवा करण्यामध्ये बाधा येऊ नये म्हणून अविवाहित राहून जीवनाचा प्रत्येक क्षण गाव, समाज आणि देश सेवेत लावण्याचा निर्णय घेतला.आज वयाच्या 78 व्या वर्षापर्यंत ईश्वराने अखंडपणे सेवा करून घेतली आहे. अशा प्रकारची निष्काम वृत्तीने समाज व देशाची सेवा करीत असताना काही समाज कंटक, स्वार्थी लोकांचा स्वार्थ दुखावला गेल्याने वेग-वेगळी दुखावलेली माणसं मला जीवे मारण्याची धमक्या देत आली आहेत. अशा प्रकारे तेरा ते चौदा वेळा आलेल्या धमक्यांमुळे माझ्या संरक्षणात गृहखात्या तर्फे वाढ केली जात आहे. मी यापूर्वी चार वेळेला सरकारला पत्र पाठविली आहेत की, ह्यमला संरक्षणाची गरज नाही म्हणून संरक्षण काढून टाकाह्ण. मात्र सरकार संरक्षण काढीत नाही या ऊलट त्यामध्ये वाढ करीत आहे. माझी अशी धारणा आहे की सरकारच्या फक्त संरक्षणाने माझे मरण थांबेल का? थांबेल म्हणावं तर देशाच्या उच्च पदावर असणाऱ्या इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांना सुद्धा सरकार वाचवू शकले नाही तर माझ्या सारख्या मंदिरात राहणार्‍या फकीर माणसाचे काय? मला मारण्यासाठी काही वेळेला सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ईश्वर कृपेने मी अद्याप ही जिवंत आहे. राळेगणसिद्धी सारख्या अडीच हजार लोकसंख्येच्या गावात 9 अंगरक्षक व 28 पोलीस कर्मचारी यांची सर्वांची राहण्याची व इतर सोय करणे सोपे काम नाही. त्याचप्रमाणे मी कोणाला त्रास होईल म्हणून बाहेर ही सांगितले नाही मात्र ही वस्तुस्थिती आहे. संरक्षणासाठी जे अंगरक्षक असतात ते मी सकाळी साडेपाच वाजता वॉकिंगला बाहेर जातो तेव्हा काही वेळ एकही अंगरक्षक नसतात तर काही वेळेला मी बाहेर गेल्यानंतर पोलीसाने अंगरक्षकाला झोपेतून उठविलेले आहे. घाई गडबडी मध्ये उठल्यामुळे पायात चप्पल, बुट, नसलेले अनवानी अंगरक्षक मी पाहिले आहेत. जे पोलीस संरक्षणासाठी ठेवलेले आहेत ते मी सकाळी जेव्हा योगासने करत असतो तेव्हा त्यातील काही पोलीस कर्मचारी माझ्या समोरच खुर्चीमध्ये पायाची अढी करून आपल्या मोबाईलवर एवढे गढून गेलेले असतात की मारणारे मला मारून कधी जातील हे कळणार सुद्धा नाही. राळेगणसिद्धी मध्ये दोन पोलीस गाड्या रात्रंदिवस उभ्या असतात मात्र दौऱ्यावर असताना कधी कधी एकही गाडी नसते. कधी बाहेर दौऱ्यावर असताना गाडीमध्ये काही वेळेला काही अंगरक्षक झोपलेले असतात. या पोलीस संरक्षणावर देखरेख करण्यासाठी एक सुपरवायझर नेमलेले आहेत हे मला 2 मार्च 2016 रोजी समजले तो पर्यंत त्यांना मी कधीही पाहिले नाही. प्रश्न फक्त अण्णा हजारे यांच्या संरक्षणाचा नाही तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारीची जाणीव कमी होत चालली आहे हा खरा प्रश्न आहे.यापूर्वी ही मी पत्राद्वारे कळविले आहे की तुमच्या संरक्षमाचा मला आपण समजता तेव्हढा उपयोग होत नाही. एका बाजूला राज्यामध्ये पुरेसे पोलीस कर्मचारी नसल्याने सुरक्षा व्यवस्थेवर ताण पडतो. जिथे गरज आहे तिथे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपूरी असल्याने जी संख्या आहे त्यांच्यामध्ये सामाजिक, राष्ट्रीय दृष्टीकोन कमी होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येते समाज्याचा हा पैसा वायाला चालला आहे असे मनोमन वाटायला लागते. ज्या राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्या राज्याला हे परवडणारे नाही असे मला वाटते.अंगरक्षक आणि पोलीस यांचा माझ्या संरक्षणाच्या माध्यमातून जवळून संबंध आल्यामुळे काही अंगरक्षक आणि पोलीस यांच्या मध्ये शिस्तीचा अभाव पाहून या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे काय होणार? हा प्रश्नच आहे. मी माझे जीवनच समाज आणि राष्ट्रहितासाठी अर्पण केलेल असल्याने माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही माझे संरक्षण वाढवू नका त्यामुळे मला त्रास होतो कारण तो जनतेचा पैसा आहे. मी शासनाला लिहून देतो की उद्या माझे जीवनाचे काही कमी-जास्त झाले तर ती सर्वस्वी माझी जबाबदारी राहील. त्याचा दोष शासनावर राहणार नाही, शासन त्याला जबाबदार राहणार नाही.वयाच्या 78 वर्षापर्यंत कोणतीही सत्ता नाही, धन नाही, दौलत नाही तरी सुद्धा ईश्वराने जे काही थोडं फार करवून घेतले. आता पुढील जीवन हे माझे बोनस जीवन समजून जो पर्यंत ईश्वर करवून घेतो आहे तो पर्यंत समाज व देशासाठी करीत राहिल. मरण हे भारत-पाकिस्तान युद्धात खेमकरनच्या सीमेवर मरून गेल्यामुळे आता मला मरणाची भिती नाही त्यामुळे संरक्षणाची गरज नाही.