लोकमत न्यूज नेटवर्कवसई (जि. पालघर): व्यायामशाळेत व्यायाम करीत असताना मंगळवारी संध्याकाळी जेनिडा कार्व्हालो या ३० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ती वसईतील एव्हरशाईन नगरातील मधुबन हाईट्स येथे राहात होती. याच भागातील व्यायामशाळेत व्यायाम करीत असताना ती अचानक खाली कोसळली. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. व्यायामशाळेतील साहित्य, प्रशिक्षक यांची तपासणी-चौकशी पोलीस करीत आहेत.
व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू
By admin | Updated: June 29, 2017 02:00 IST