शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांमुळे मृत्यू :विषबाधाप्रकरणी एसआयटी स्थापन, वभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 03:43 IST

यवतमाळ व अकोला जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनवरील कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधेमुळे झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मृत्यूप्रकरणी विभागीय महसूल आयुक्तांच्या

मुंबई : यवतमाळ व अकोला जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनवरील कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधेमुळे झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मृत्यूप्रकरणी विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय विशेष चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली. कृषी विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला.विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अमरावतीचे विशेष पोलीस महासंचालक, आरोग्य सहसंचालक, विभागीय कृषी संचालक सदस्य असतील. याशिवाय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक आणि फरिदाबाद येथील प्लान्ट प्रोटेक्शनचे प्रतिनिधी अशा सात जणांचा समावेश असणार आहे. याशिवाय तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित सदस्य म्हणून बोलाविण्याचा अधिकार एसआयटीच्या अध्यक्षांना देण्यात आला आहे.शेतकºयांच्या मृत्यूप्रकरणी कारणीभूत जबाबदार घटक नक्की करणे, अशा प्रकारच्या आपत्तींवर प्रतिबंधासाठी कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करताना घडलेल्या चुका, त्याकरिता जबाबदार व्यक्ती, संस्था निश्चित करणे, चिनी स्प्रेवरील बंदीबाबत शिफारस करणे, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीला तीन आठवड्यांत आपला अहवाल सादर करायचा आहे.यवतमाळ प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, हिवताप अधिकारी, पोलीस, वन अधिकारी, पशुशल्य चिकित्सक तसेच खासगी दवाखाने, गट विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक, तालुका कृषी अधिकारी आदींनी वेळीच अहवाल सादर केला नसल्याचा ठपका, कृषी विभागाच्या गुरुवारी जारी जीआरमध्ये ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार