मुंबई : भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका ६४ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. चुनाभट्टी प्रियदर्शनी सर्कल येथील सायन-उत्तर वाहिनी मार्गावर ही घटना घडली. दामजी नागदा असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यामध्ये अक्षय कुलकर्णीला (३१) अटक झाली.नागदा हे मुलुंड येथील रहिवासी आहेत. भरधाव आलेल्या हुंदाई कारने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिल्यानंतर ते खाली कोसळताच त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. यावेळी घटनास्थळी ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. (प्रतिनिधी)
पूर्वमुक्त मार्गावर कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
By admin | Updated: August 1, 2016 04:13 IST