शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 22:13 IST

काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच नेत्यांची जोरदार तयारी असून महायुती देखील प्रचाराला लागली आहे. निवडणूकीपूर्वीच्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. याअंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दर महिनेला दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. हा 'चुनावी जुमला' असल्याची टीका विरोधकांनी केली होती. आता मात्र भाजप आमदाराने याबाबत कबुली दिली आहे.

काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांनी लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य केले आहे. जाहीर सभेमध्ये त्यांनी केलेले हे वक्तव्य गाजत असून व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचा आधार घेत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकावर हल्लाबोल केला आहे. महायुतीला मतांचा दुष्काळ असल्यानं लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला  जुगाड आहे, हे भाजप आमदाराने मान्य केल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

विजय वडेट्टीवार काय म्हणाले? आमदार टेकचंद सावरकर यांचा व्हिडीओ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महायुतीला टोला लगावला आहे. विजय वडेट्टीवार यांनी लिहिले आहे की, अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी लाडकी बहीण योजनेबाबत विधान केले. ते म्हणाले की, आम्ही एवढी मोठी भानगड कशासाठी केली, तुम्ही इमानदारीने सांगा. ज्या दिवशी तुमच्या घरापुढे मतदानाची पेटी येईल. त्यावेळी या माझ्या लाडक्या बहिणी कमळाला मत देतील, यासाठी आम्ही हे जुगाड केलंय. हे सर्वजण खोटं बोलले असतील. मात्र, मी खरं बोलतो. माझं बोलणं खरं आहे की नाही? नाहीतर बोलायचं एक आणि करायचं एक, मी काय रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे का?, असे विधान भाजपाचे आमदार टेकचंद सावरकर यांनी केले आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारtekchand sawarkarटेकचंद सावरकर