शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Pune Bypoll Election 2023: “पैसे वाटणे भाजपची संस्कृती नाही, आम्ही निवडणूक जिंकू”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 20:36 IST

Pune Bypoll Election 2023: जेव्हा पायाखालची वाळू सरकते. तेव्हा असे आरोप होऊ लागतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

Pune Bypoll Election 2023: कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार थांबला आहे. आता मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, यातच काँग्रेसचे कसबा पेठ मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. यानंतर रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी यासाठी भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. 

कसबा पेठ मतदारसंघात भाजपकडून पैशांचा वापर सुरु आहे, असा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपतीसमोर आंदोलन केलं.  मात्र या आंदोलनात आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. जेव्हा पायाखालची वाळू सरकते. तेव्हा असे आरोप होऊ लागतात. मात्र हे आरोप भाजपवर नाही आहे. तर हे आरोप मतदारांवर आहे की, मतदार पैसे घेऊन मतदान करतात. मतदारांचा असा अपमान करण्याचा कुठलाही अधिकार काँग्रेस एनसीपी पक्षाला नाही. पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरू, मात्र पैसे वाटणार नाही

आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरू, मात्र पैसे वाटणार नाही. मतदारच आम्हाला वारंवार जिंकून देतात. कसबा आणि चिंचवडमध्ये आम्ही जिंकणार आहोत. हे माहीत पडल्यानंतर असा रडीचा डाव सुरू झालेला आहे. कसबामध्ये आचारसंहितेचा खुले उल्लंघन करण्यात आले आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. तसेच संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, मी सनसनाटी निर्माण करण्यासाठी कधीही विधान करत नाही. जे विधान मी करतो त्याचे माझ्याजवळ नेहमीच पुरावे असतात, आता ती वेळ नाही योग्यवेळी सगळ्या गोष्टी सांगेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो, असे सांगत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड