शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “राऊतांची तक्रार सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे का, ते सहानुभूतीसाठी...”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 22:04 IST

Maharashtra News: संजय राऊतांना प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे बिनडोकपणाचे आरोप केले जात आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. संजय राऊत यांनी दोन हजार कोटींची डील झाली, हा न्याय नाही, असा मोठा आरोप केला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका गुन्हेगाराला आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत यासंदर्भातील तक्रार पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे देण्यात आली आहे. या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत यांच्या या तक्रारीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत यांनी जी तक्रार दिली आहे ती तक्रार सुरक्षेसाठी दिले आहे की, सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे त्याची चौकशी केली जाणार आहे.  सुरक्षा व्यवस्थेचा विषय घेऊन तो राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बिनडोकपणाचे आरोप केले जात आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

सरकारवर चुकीच्या पद्धतीने आरोप करत आहेत

कधी २ हजार कोटीचा आरोप करतात, तर कधी सुरक्षा व्यवस्थेतवरून ते सरकारवर चुकीच्या पद्धतीने आरोप करत आहेत. मात्र ते चुकीचे असून त्यांना जर हे सहानुभूतीसाठी मिळवायचे असेल तर त्याकडे लोक चुकीच्या नजरेने बघत आहेत. सुरक्षा व्यवस्थेवरून राजकीय आरोप करणे चुकीचे आहे. तसेच त्यांना सुरक्षेची आवश्यकता असल्यास ती अवश्य पुरवली जाईल. महाराष्ट्रात यावरून कधीही राजकारण केले जात नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, कोणत्याही नेत्याला सुरक्षा देण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करीत नाहीत तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती नेमलेली असते. ती समिती त्या त्या नेत्याचे सर्वेक्षण करून सुरक्षेच्या संदर्भात निर्णय घेत असते. त्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊत