शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस आता संपले - शाहू महाराज यांनी ठणकावले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:00 IST

विश्वास पाटील मुंबई : भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर आजवर प्रस्थापित राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरून चालण्याचीच भूमिका बजावली; परंतु असे गृहीत धरून चालण्याचे दिवस आता संपले आहेत. सर्वच क्षेत्रांत होत असलेल्या पीछेहाटीमुळे समाजबांधव अस्वस्थ झाला आहे. समाजाचा आक्रोश रास्त आहे, म्हणूनच लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नोकरी व शिक्षण क्षेत्रातील आरक्षण देण्यासह मराठा समाजाच्या ...

विश्वास पाटील मुंबई : भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर आजवर प्रस्थापित राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरून चालण्याचीच भूमिका बजावली; परंतु असे गृहीत धरून चालण्याचे दिवस आता संपले आहेत. सर्वच क्षेत्रांत होत असलेल्या पीछेहाटीमुळे समाजबांधव अस्वस्थ झाला आहे. समाजाचा आक्रोश रास्त आहे, म्हणूनच लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नोकरी व शिक्षण क्षेत्रातील आरक्षण देण्यासह मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाचे व्यापक धोरण जाहीर करा, अशी स्पष्ट मागणी कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.बुधवारी मुंबईत निघणाºया विराट मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता शाहू महाराज म्हणाले, ‘आजपर्यंत मराठा समाजाने संपूर्ण राज्यात जिल्हानिहाय शांततेने मोर्चे काढले. या मोर्चातून मराठा समाजाचा आक्रोश पाहायला मिळाला. इतके होऊनही जर सरकार गांभीर्याने दखल घेणार नसेल, तर मराठा समाज आक्रमक बनेल. तोपर्यंत सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. मराठे आता त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पेटून उठले आहेत.राजर्षी शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांसह बहुजन समाजाला संस्थानच्या नोकºयांत पन्नास टक्के आरक्षण दिले. शिक्षणाची द्वारे सर्वांसाठी खुली केली. शाहू महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शाहूंचा हा विचार जसाच्या तसा अमलात आणला गेला नाही. तो अमलात आणणे आवश्यक होते. जर राजर्षी शाहू महाराजांची भूमिका जशीच्या तशी स्वीकारली असती, तर आज हे चित्रच दिसले नसते.आजवर प्रस्थापित राज्यकर्त्यांनी या समाजाच्या उन्नती करता जेवढे लक्ष द्यायला पाहिजे होते तेवढे दिले नाही, म्हणूनच मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस आता संपले आहेत. राज्यकर्ते आपल्यासाठी काही करीत नाहीत, आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो, ही भूमिका घेऊन आज मराठे लढत आहेत. पाणी गळ्यापर्यंत आले आहे, यापुढे हा समाज सहन करण्याच्या स्थितीत नाही. कायदे बदलून आरक्षण द्यावेच लागेल. तोपर्यंत मराठा समाजाचा राग शांत होणार नाही, असे शाहू महाराज यांनी बजावले.आरक्षण देणार कसे..?आरक्षण कसे देणार? हाही प्रश्न आहे. महाराष्टÑातील मराठा समजाला आरक्षण मिळेलही, पण राज्याबाहेरील मराठा समाजाचे काय? मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, ओडिसा, तामिळनाडू, गोवा, बिहार, पंजाब, दिल्ली आदी राज्यांतही मराठा समाज आहे. तिथल्या मराठ्यांची अवस्था फारच वाईट आहे, त्यांनाही न्याय मिळायला हवा.फडणवीस यांनी पुढाकार घ्यावामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिकेतून महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी मराठा समाजाच्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करावी. यानिमित्ताने राज्य शासन सर्वसमावेशक व पुरोगामी असल्याचे सिद्ध करून दाखवावे, असे त्यांनी म्हटले आहे.प्रशासकीय सेवेत स्थान द्याभारतीय लष्करात तसेच प्रशासकीय सेवेतील मराठा समाजाचे प्रमाण बेताचेच आहे, ते वाढवायचे असेल तर राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एन.डी.ए.), प्रशासकीय सेवा भरती सारख्या परीक्षांतही मराठ्यांना स्वतंत्र प्रर्वगात आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी शाहू महाराज यांनी केली.