शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदच्या मुंबईतील प्रॉपर्टीवर पुन्हा लागणार बोली, 14 नोव्हेंबरला होणार पुन्हा लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 20:03 IST

अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील तीन जंगम मालमत्तेवर पुन्हा एकदा बोली लावली जाणार आहे.

मुंबई : अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील तीन जंगम मालमत्तेवर पुन्हा एकदा बोली लावली जाणार आहे. भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीट परिसरातील येथील सदनिका व हॉटेल अफरोजाच्या खरेदीसाठी इच्छुकांना आवाहन करण्यात आले असून १४ नोव्हेंबरला हा लिलाव होणार आहे.केंद्र सरकारच्या वतीने एका खासगी कंपनीकडून हा व्यवहार करण्यात येणार आहे. सुमारे दोन वर्षापूर्वी हॉटेलचा लिलाव करण्यात आला होता. मात्र ती खरेदी करण्याची तयारी दाखविलेल्या स्वयंसेवी संस्थेला ती निर्धारित मुदतीमध्ये रक्कम भरता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बोली लावली जाणार आहे. ठाणे पोलिसांनी महिन्याभरापूर्वी दाऊदचा भाऊ इकबाल कासकर अटकेत असल्यामुळे यावेळी इच्छुकांच्या संख्येत वाढ होईल, या शक्यतेने लिलाव जाहीर करण्यात आल्याचे कंपनीतील अधिका-यांकडून सांगण्यात आले.१९९३च्या बॉम्बस्फोटानंतर भारतातून फरारी झालेल्या दाऊदच्या देशभरातील मालमत्ता केंद्राने जप्त केल्या आहेत. मात्र दहशतीमुळे त्या खरेदी करण्यामध्ये कोणी स्वारस्थ दाखवित नसल्याने बहुतांश स्थावर मालमत्ता पडून असल्याची परिस्थिती आहे.आता आयकर विभागाच्यावतीने अश्विन अ‍ॅण्ड कंपनी अक्युशनर्स या खासगी कंपनीद्वारे पाच मालमत्तेच्या लिलावासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली आहे. त्यापैकी तीन प्रॉपर्टी या मुंबईतील आहेत. पाकमोडिया स्ट्रीटवरील डांबरवाला बिल्डिंगमधील खोली क्रमांक १८,१९,२०, २५, २६ व २८ या खोल्या, तसेच याकुब स्ट्रीटवरील शबनम गेस्ट हाऊस आणि हॉटेल रौनक अफरोज (दिल्ली जायका) या मालमत्तेचा समावेश आहे. या बिल्डीगमधील काही खोल्या या दाऊदचा भाऊ इकबाल कासकर व बहिण हसीना पारकर याच्या मालकीच्या आहेत. हसीनाच्या मृत्यूनंतर तिची मुले या ठिकाणी राहतात. गेल्या महिन्यात ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने इकबाल कासकरला याच बिल्डिंगमधून अटक केली होती.--------------------------दाऊदच्या देशभरातील विविध मालमत्तेसाठी यापूर्वी गेल्या काही वर्षात आतापर्यंत चार वेळा बोली लावण्यात आली आहे. मात्र त्याच्या दहशतीमुळे स्थावर प्रॉपर्टी घेण्यासाठी फारसे कोणी उत्सुक नव्हते. यापूर्वी ९ डिसेंबर २०१५ रोजी झालेल्या लिलावावेळी दाऊदचा कधी काळी अड्डा समजल्या जाणा-या हॉटेल अफरोज हे ज्येष्ठ पत्रकार व देशसेवा स्वयंसेवी संस्थेचे चालक एस.बालाकृष्णन यांनी सर्वाधिक ४ कोटी २८ लाखाची बोली लावीत ती जिंकली. त्यासाठी ३० लाख रुपये अनामत रक्कमही भरली. मात्र उर्वरित रक्कम महिन्याभरात भरू न शकल्याने खरेदीचा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. दरम्यान, बालकृष्णन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण रकमेची पूर्तता करण्यासाठी आणखी महिन्याभराची मुदत मागितली होती, मात्र कंपनीने त्याला नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. लिलावाच्या कालावधीत बालाकृष्णन यांना धमक्याही देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने दाऊदच्या टोळीतील अब्बासला अटक केली होती.-----------------दाऊद फरारी असला तरी त्याच्या टोळीची दहशत कायम असल्याने त्याची प्रॉपर्टी कोणी खरेदी करीत नसल्याची परिस्थिती आहे. मात्र आता दाऊदची बहीण हसीना पारकरचे निधन तसेच भाऊ इकबाल हा पोलिसांच्या ताब्यात असल्याने यावेळी इच्छुकांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.