शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या वैधतेला मुलगी देऊ शकते आव्हान - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 07:07 IST

निकालानुसार, संबंधित महिलेने सन २०१६ मध्ये  कुटुंब न्यायालयात दिवंगत वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या वैधतेला आव्हान दिले. तिने केलेल्या याचिकेनुसार, २००३ मध्ये तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी लगेच दुसरा विवाह केला.

मुंबई : वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या वैधतेला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. ज्या दोघांचा विवाह झाला आहे, तेच दोघे विवाहाच्या वैधतेला न्यायालयात आव्हान देऊ शकतात, या कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाला एका ६६ वर्षीय महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. आर. डी. धानुका व न्या. व्ही. जी. भिष्ट यांनी ही याचिका दाखल करून घेतली. निकालानुसार, संबंधित महिलेने सन २०१६ मध्ये  कुटुंब न्यायालयात दिवंगत वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या वैधतेला आव्हान दिले. तिने केलेल्या याचिकेनुसार, २००३ मध्ये तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी लगेच दुसरा विवाह केला. २०१६ मध्ये तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिला समजले की, वडिलांनी ज्या महिलेशी दुसरा विवाह केला, त्या स्त्रीने २०१६ पर्यंत तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला नव्हता. त्यामुळे तिच्या वडिलांचा दुसरा विवाह वैध असल्याचे म्हणता येणार नाही. मात्र, विवाह झालेल्या व्यक्तीच म्हणजे पती किंवा पत्नी  त्यांच्या विवाहाच्या वैधतेला आव्हान देऊ शकतात, असा युक्तिवाद महिलेच्या सावत्र आईकडून कुटुंब न्यायालयात करण्यात आला.मात्र, उच्च न्यायालयाने म्हटले की, मुलीला वडिलांच्या निधनानंतर हे सत्य समजले. त्यानंतर तिने लगेच कुटुंब न्यायालयात धाव घेतली. वडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या विवाहातील या त्रुटी समोर आणून वडिलांच्या विवाहाच्या वैधतेला आव्हान दिले. मुलीला वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या वैधतेला आव्हान देण्याचा अधिकार नाही, हा कुटुंब न्यायालयाचा निर्णय अयोग्य आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने  मुलीच्या अर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश कुटुंब न्यायालयाला दिले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCourtन्यायालयWomenमहिला