शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दत्ता पडसलगीकर यांनी स्वीकारली पोलीस महासंचालकपदाची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 18:27 IST

सतीश माथूर यांच्या निवृत्तीनंतर दत्ता पडसलगीकर यांनी स्वीकारली जबाबदारी

मुंबई - दत्ता पडसलगीकर यांनी  राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून आज पदभार स्वीकारला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर हे आज आपल्या ३७ वर्षांच्या आयपीएस सेवेनंतर निवृत्त होत असून त्यांच्या जागी सध्या पोलीस सेवेत सर्वात ज्येष्ठ असलेले मुंबईचे दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती झाली आहे. पडसलगीकर यांच्या जागी स्वातंत्र्यानंतरचे मुंबईचे ४१वे पोलीस आयुक्त म्हणून सुबोधकुमार जयस्वाल यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.येत्या ३१ ऑगस्ट रोजी दत्ता पडसलगीकर हे देखील सेवाज्येष्ठतेनुसार सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र, पडसलगीकर यांनी गेली ३६ वर्षे केलेली निष्कलंक सेवा व मुंबईची वाहिलेली यशस्वी धुरा पाहता या प्रामाणिक अधिकाऱ्याला राज्य व केंद्र शासन ऑगस्टनंतर सहा महिने मुदतवाढ देणार आहे अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे येत्या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मुंबईचे आयुक्तपद व पोलीस महासंचालकपद रिक्त होणार असल्याने ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परमवीर सिंग यांनी गेल्या तीन वर्षांत ठाण्यात केलेली उत्कृष्ट कामगिरी पाहता त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी फेब्रुवारी महिन्यात वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच राज्याचे महासंचालक म्हणून अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय बर्वे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. संजय बर्वे हेही पुढील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस