शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Dasara Melava Update: ... तर भविष्यात परवानगी नाकारण्याचे कारण ठरेल; उच्च न्यायालयाची ठाकरेंना महत्वाची अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 17:18 IST

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिवसेनेला दसरा मेळाव्यावेळी मोठी काळजी घ्यावी लागणार. नाहीतर पुढच्या वर्षी शिवाजी पार्क हातचे जाण्याची शक्यता.

खरी शिवसेना कोणाची यावर न बोलता अन्य गोष्टींवर मर्यादितच युक्तीवाद करा असे उच्च न्यायालयाने तिन्ही बाजुंना सांगत आज शिवाजी पार्कवर शिवसेनाचदसरा मेळावा घेणार असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. मात्र यासाठी उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला एक अट घातली, यात दोषी आढळले तर पुढच्या वेळी परवानगी नाकारण्यासाठी ते कारण ठरेल असाही इशारा न्यायालयाने दिला आहे. 

उच्च न्यायालयाने पालिकेला तुम्हाला यापूर्वी असे अर्ज आले होते का? त्यावर त्यावेळी तुम्ही काय निर्णय घेतलात असा सवाल न्यायालयाने केला. यावर पालिकेने २०१७ मध्ये असा प्रसंग आला होता, तेव्हा दोन्ही गटांमध्ये परस्पर समजुतीने दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली होती. परंतू आता परिस्थिती वेगळी आहे. हे प्रकरण समजुतीने सोडविण्यासारखे नाहीय, असा युक्तीवाद पालिकेने केला. यावर पालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. 

ठाकरे गटाला शिवतिर्थावर मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाने उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर सदा सरवणकर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत आम्हीच खरी शिवसेना आहोत, यामुळे शिवाजी पार्कची जागा आम्हाला मिळायला हवी अशी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने शिवसेना नेमकी कोणाची हा विषयच नसल्याचे म्हणत ही याचिका फेटाळण्यात आली. 

तसेच न्यायालयाने शिवाजीपार्कवर दसरा मेळावा गेली अनेक वर्षे होतोय. सरकारने ४५ दिवस अशा कार्यक्रमांसाठी राखीव ठेवलेले आहेत, अशी टिप्पणी केली. यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देताना  कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन घेतले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. पोलीस व्हिडीओ शुटींग करतील. काही घटना घडली आणि याचिकाकर्ते कोणत्याही घटनेला जबाबदार असल्याचे आढळले तर भविष्यात त्यांना तिथे दसरा मेळावा नाकारण्याचे कारण ठरू शकेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाDasaraदसरा