शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रचना दर्डा व आर्यमन दर्डा यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 18:24 IST

‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या पत्नी रचना दर्डा आणि मुलगा आर्यमन दर्डा यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा आज मुंबईत शुभारंभ झाला आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या पत्नी रचना दर्डा आणि मुलगा आर्यमन दर्डा यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा आज मुंबईत शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत या छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. 

मुंबई-  ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या पत्नी रचना दर्डा आणि मुलगा आर्यमन दर्डा यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा आज मुंबईत शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत या छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. यावेळी  लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलताना छायाचित्र प्रदर्शनाचं भरभरून कौतुक केलं. या प्रदर्शनातून भारताचं चित्र पाहायला मिळतं आहे. खरा भारत जून भारत छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. तर तरूण कलाकार आर्यमन दर्डा यांचीही कलाकृती उत्तम असून वन्यजीवांची अनोखी कलाकृती इथे पाहायला मिळाली, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आर्यमन दर्डा यांचं कौतुक केलं आहे. छायाचित्र जशी उत्तम आहेत, तसंच त्यामागील उद्देशही उत्तम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हंटलं. 

अमृता फडणवीस यांनी रचना दर्डा व आर्यमन दर्डा या दोघांच्याही कामाचं कौतुक केलं आहे. छायाचित्र प्रदर्शन सगळ्यांना मंत्रमुग्ध करेल असं आहे. अतिशय उत्तम प्रकारे कला सादर केली असून सगळ्यांनी हे प्रदर्श पाहायला हवं, असं मत यावेळी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. 

आपला छंद असो वा आवड, त्या माध्यमातून समाजाच्या विकासाकरिता हातभार लावणे हा विचार दुर्मीळच. मात्र, या विचारावर आधारलेले एक विशेष छायाचित्र प्रदर्शन कलारसिकांच्या भेटीस आलं आहे. माय-लेकांनी आपल्या रोजच्या जगण्यातील छायाचित्रणाची आवड जपत, सामाजिक जबाबदारी ओळखून विशेष उपक्रम हाती घेतला आहे. ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या पत्नी रचना दर्डा यांचे देशभरातील विविध ठिकाणची प्राचीन परंपरा, कला संस्कृतीचे; तर त्यांचे पुत्र आर्यमन दर्डा यांनी जगभरातील जंगलातून वन्यजीव छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केली आहेत.

भायखळ्यामधील ‘द ग्रेट ईस्टर्न मिल कम्पाउंड’ येथील ‘नाइन फिश आर्ट गॅलरी’ येथे प्रदर्शना कलारसिकांसाठी सुरू झालं आहे.रचना देवेंद्र दर्डा यांनी राजस्थान, महाराष्ट्र, कोलकाता, मध्य प्रदेश आदी राज्यांतील विविध व्यक्ती, निसर्ग, प्राचीन स्थळे यांचे छायाचित्रण केले आहे. ‘ब्राऊन’ असे या प्रदर्शनाचे नाव असून यामध्ये देशभरातील मातीशी जोडलेल्या सर्वसामान्यांची वस्तुस्थिती दर्शविणाऱ्या फोटोंचा समावेश आहे. या छायाचित्रांत त्या-त्या राज्यांतील संस्कृती आणि विचारांचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून येणारे सर्व उत्पन्न ग्रामीण भागातील पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. शिवाय, त्यांना शालेय साहित्य, गणवेश आदींसाठी सहकार्य करण्यात येणार आहे. जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे.

दहावीत शिकत असलेले आर्यमन देवेंद्र दर्डा हे पंधरा वर्षांचे आहेत. शालेय अभ्यासाबरोबरच त्यांना लहानपणापासून पर्यावरण आणि निसर्गाच्या संवर्धनाची विशेष आवड आहे. त्यातूनच त्यांनी ‘लिटिल प्लॅनेट फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. केनिया, टांझानिया, दक्षिण आफ्रिका येथे जंगल सफारी करीत, वन्यजीवन आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ‘सँक्चुरी एशिया’ या संस्थेचे संस्थापक बिट्टू सहगल यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यमन हे मागील सहा महिन्यांपासून प्रशिक्षण घेत आहेत.या प्रदर्शनातून मिळणारा सर्व निधी वन्यजीवन आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी देण्यात येणार आहे. हे छायाचित्र प्रदर्शन २७ ते ३० ऑक्टोबरपर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांसाठी खुले राहणार आहे.