शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

साथींच्या आजारांचे पाच बळी, डेंग्यू, मलेरिया आणि हेपेटायटिसचे सावट कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 21:14 IST

मुंबई : पाऊस गेल्यानंतरही मुंबई शहर-उपनगरांतील साथीच्या आजारांचे सावट कायम असल्याचे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील अहवालातून उघडकीस आले आहे.

मुंबई : पाऊस गेल्यानंतरही मुंबई शहर-उपनगरांतील साथीच्या आजारांचे सावट कायम असल्याचे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील अहवालातून उघडकीस आले आहे. या अहवालानुसार आॅक्टोबर महिन्यात साथींच्या आजारांमुळे तब्बल पाच बळी गेल्याची नोंद आहे. त्यात एका सहा वर्षांच्या लहानग्याचा, तर एका गर्भवतीचा समावेश आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात ताप, सर्दी, खोकला, अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य खात्याने केले आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अहवालानुसार, १ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान शहर-उपनगरात ३ हजार २९३ डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात ४ हजार ९८ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यंदाच्या आॅक्टोबर महिन्यात स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण आढळून आले आहे, सप्टेंबर महिन्यात ही संख्या ३३ एवढी होती.आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूमुळे भांडुप येथील ३५ वर्षीय गर्भवतीचा मृत्यू झाला, तिला टीबीसुद्धा झाला होता. याशिवाय, हृदयविकाराचा त्रास असलेल्या ५० वर्षीय महिलेचाही डेंग्युमुळे मृत्यू झाला. तर कांदिवली येथील २५ वर्षीय तरुणाचाही डेंग्यूमुळे मृत्यू झाला, हा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होता, त्यानंतर प्रकृती अत्यवस्थ असल्याने पालिकेच्या हलविण्यात आले त्यावेळेस त्याचा मृत्यू झाला.हेपेटायटिसने मालवणी येथील सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्यावरही पहिल्यांदा खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, नंतर पालिकेच्या रुग्णालयात हलविण्यात आले. याखेरीज मलेरियाने ग्रँट रोड येथील ७२ वर्षीय वृद्धाचा बळी घेतला. साथींच्या आजारांच्या बळीनंतर करण्यात त्या-त्या परिसरात करण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षणात १ हजार ९८० घरांची तपासणी करण्यात आली, त्यात ८ हजार ७६० नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात १३ जणांना ताप, सहा जणांना कफ, थंडी व तीन जणांना डायरिया आढळून आला, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर मालवणी परिसरात करण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षणात १ हजार ३०० घरांतील  ४ हजार ९७० लोकांना तपासण्यात आले. त्यात ४ जणांना ताप, दोघांना डायरिया आढळून आला. तर ग्रँट रोड परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत ५१७ घरांमधील १ हजार ७१० लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये एकाला ताप असलेला दिसून आला.आजार        सप्टेंबर २०१७     आॅक्टोबर २०१७डेंग्यू                   ४१२               २१२लेप्टो                     ५९                 १८मलेरिया              ८४९              ५६३गॅस्ट्रो                   ५३२              ५४६हेपेटायटिस          १०५                ८९स्वाइन फ्लू            ३३                 ०५

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका