शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
2
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
3
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
4
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
5
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
6
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
7
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
8
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
9
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
10
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
11
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
12
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
13
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
14
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
15
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
16
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
17
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
18
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
19
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
20
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Jitendra Awhad Dahi Handi: "माझ्या प्रिय बाळ गोपाळांनो, गोविंदांनो उद्या कृष्णजन्माष्टमी...." दहीहंडीच्या पूर्वसंध्येला जितेंद्र आव्हाडांची भावूक साद, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 21:01 IST

Jitendra Awhad: मुंबई आणि ठाणे परिसरातील दहीहंडीचा विषय आला की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या दहीहंडीचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो.

मुंबई  - मुंबई आणि ठाणे परिसरातील दहीहंडीचा विषय आला की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या दहीहंडीचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आव्हाडांच्या दहीहंडीचं आयोजन झालं नव्हतं. तसेच यावर्षीही आपण दहीहंडीचं आयोजन करणार नसल्याचे आव्हाड यांनी जाहीर केले होते. दरम्यान, उद्या होणाऱ्या दहीहंडीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी गोविंदाना सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून साद घातली आहे.

या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात की,  गोकुळात भगवान श्री कृष्ण जन्मले आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. नीतीने भ्रष्ट आणि वागणुकीने दृष्ट अश्या कंस मामाचा वध करत भगवंताने जुलमी राजवटीचा अंत केला. अशा ह्या नटखट बाळ गोपाळ श्रीकृष्ण भगवंताची दही-लोणी मिळवण्यासाठीची सख्या सोबत्यांसोबतची कसरत म्हणजे एखादा उत्सवच आणि ह्याच खेळाची आठवण म्हणजे आपला आवडता दहीकाला किंवा दहीहंडी. ज्याची प्रत्येक तरुण तरुणी, बाळ गोपाळ वाट पाहतात तो क्षण... मराठी मातीत आणि मराठी मनामनात रुजलेला पवित्र श्रावण महिन्यातील आवडता सण...

मी देखील तुमच्या सर्वांसारखीच ह्या सणाची आवर्जून वाट पाहणारा आणि उत्साहाने दहीहंडीचे आयोजन करणारा कारण माझे बालपणच चाळीतील एका छोट्याश्या खोलीतले आणि चाळ म्हंटली तर तुम्हाला माहीतच असेल दहीहंडी म्हणजे धम्माल. लहानपणी असाच एकदा दहीहंडी मध्ये थरावर थर लावताना पाय सटकून खाली पडलो आणि डोक्याला मार लागला... त्या दिवशी आई वडील खूप रागावले खूप ओरडले खूप चिंताग्रस्त झाले पण आपला उत्साह दांडगा आणि इतक्या वर्षांमध्ये टिकून राहिला सुद्धा...1993 साली मी पहिली दहीहंडी स्पर्धा आयोजित केली... पहिली स्पर्धा आणि मी दिवसभर नाही असे होईल का ? सकाळी 9 वाजता मी व्यासपीठावर हजर तर ते थेट रात्री 11 वाजेपर्यंत... माझे जेवण हि तिकडेच आणि दिवसभर श्रम हि तिकडेच… हे दरवर्षीचे होते.

संघर्ष च्या माध्यमातून दहीहंडीला एक जागतिक परिमाण लाभावे म्हणून अनेक प्रयत्न केले. प्रत्येक संघाला बक्षीस... थरांवर बक्षीस देणारा कदाचित मी एकमेव असेन आणि हंडी फोडणारे तर एकदम खासच... मला आठवतंय एका वर्षी तर 100 हून ही अधिक संघानी दहीहंडीला भेट दिली आणि मी एकही संघाला रिकाम्या हातानी नाही जाऊ दिले कारण हंडी फुटली नाही म्हणून काय झाले त्यांची मेहनत फार महत्वाची...

अशी ही दहीहंडी म्हंटली की सर्व सर्व जाती भेद ,धर्म भेद विसरून एकत्र येणे खेळ खेळण्याचा हा सण निराळाच. खालील थर उभारणारी माणसे मजबूत असली की वरील नेतृत्व करणारे बाळ गोपाळ एकदम निर्धास्त आणि मग एकच फटका मारला रे मारला की फुटली रे फुटली हंडी फुटली चा जल्लोष... वाह अजूनही आठवते हे सगळे....

परंतु आता हे शक्य नाहीये मधील दोन वर्ष तर कोरोना मध्येच गेले त्यातल्या त्यात कोर्टाचे निर्णय आलेत काही निर्बंध गोविंदांच्या वयाचे अथवा साहसी खेळाचे नियमांचे देखील… आजही हे पाहतो तेव्हा मनातील भावना दाटून येतात... दुरून पाहतो आता हे सगळे… एकांतात कोंडून घेतो जेव्हा बालपणीच्या आठवणी दाटून येतात. 

माझ्यातील गोविंदा कधीच संपणार नाही. तो हंडी फोडतच राहणार! दहिहंडी उत्सवाला सुरुवात केली त्याचवेळी मनात आले होते की हा मराठमोळा क्रीडा प्रकार जगभर पोहचवायचा; अन् 1999 साली दहिहंडी अन् गोविंदा जगभर पोहचविला; ग्लोबल केला. जगभरातील माध्यमांना दहिहंडीची दखल घ्यायला लावली. त्यानंतरच माझ्या दहिहंडीच्या मंचावर अनेक नेते येऊ लागले आज त्यांनी स्वत: दहिहंडी बांधायला सुरुवात केलेय.

काल जेव्हा मी गोविंदा पथकांचा सराव पहायला गेलो; अनेक गोविंदा पथकांना भेटी दिल्या. त्यावेळी लक्षात आले की कधीकाळी मी ज्या स्पेनच्या कॅसलर्सला ठाण्यात आणले होते; त्यांचे तंत्रच आपली गोविंदा पथकेही वापरत आहेत. अर्थात, त्याचा फायदाच झालाय; कारण, जास्त थर आणि तेही कमी वेळात लावणे गोविंदांना शक्य होतंय !

गोविंदा अन् दहिहंडी आपण ग्लोबल केली, याचा अभिमान आहेच. पण, हा उत्सव आपण बंद केला, याची खंत आहे. असो, आपण आपल्या श्री कृष्णाचा, बाळगोपाळांचा खेळ जगभर नेला, यातच सारे काही आहे. तेव्हा माझ्या प्रिय गोविंदांनो ...संघर्षातून उभी राहिलेली दहीहंडी यावर्षी आयोजित नाही करत आहे त्यासाठी आपणा सर्वांची माफी मागतो. परंतु आवाहनही करतो की व्यवस्थित खेळा आणि सुरक्षित राहा आणि सर्वात महत्वाचे आपला उत्साह मात्र कायम ठेवा, असे जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडDahi HandiदहीहंडीthaneठाणेPoliticsराजकारण