शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; वयाच्या 43व्या घेतला अखेरचा श्वास
3
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
4
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
5
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
6
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
7
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
8
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
9
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
10
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
11
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
12
Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
13
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
14
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
15
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
16
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
17
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
18
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
19
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
20
IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दादरच्या गणेश भुवनला पुरेसे पाणी मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:45 IST

मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक चाळींना कमी वेळ तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक चाळींना कमी वेळ तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. गिरगाव व दादरमधील जुन्या चाळींना या समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. दादरमधील ९५ वर्ष जुन्या गणेश भुवन या इमारतीलाही साधारण गेल्या दीड वर्षापासून कमी दाबाने पाणी येत असल्याने संतप्त रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

गणेश भुवन या तळमजला अधिक तीन मजली इमारतीमध्ये ८० कुटुंबे राहत आहेत, तर १० दुकाने आहेत. या इमारतीला पूर्वीपासून दुपारी ४ ते रात्री ७ वाजेपर्यंत जास्त दाबाने पाणीपुरवठा होत होता. मात्र, दीड वर्षापूर्वी पाणी कपातीच्या नावाखाली महापालिकेकडून इमारतीच्या पाण्याचा दाब कमी करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत पाणी येण्याची वेळ दुपारी चार ते रात्री सात, अशी असली तरी पूर्वीसारखे जास्त दाबाने पाणी येत नाही. परिणामी पुरेसे पाणी रहिवाशांना मिळत नाही.

आंदोलनाचा पवित्रा महापालिकेकडे याबाबत रहिवाशांनी तक्रार केली असता महापालिकेने पाण्याची टाकी बसविण्यास सांगितले. मात्र, १०० वर्षे जुन्या इमारतीवर पाण्याची टाकी कशी बसविणार ? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. दरम्यान, पाण्याचा दाब वाढवावा, या मागणीसाठी रहिवाशांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. लवकरच याप्रश्नी आंदोलन छेडण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही अधिकारी इमारतीमध्ये टाकी बसवा, अशी अव्यवहार्य सूचना देऊन निघून जात आहेत. जुन्या इमारतीमध्ये टाकी कशी बसविणार ? प्रेशर कमी न करता वेळ कमी केल्यास अडचण सुटेल. मात्र, प्रेशर कमी केल्याने वरच्या मजल्यावरील रहिवाशांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यावर तातडीने ठोस तोडगा काढावा, असे रहिवासी सिद्धेश देसाई म्हणाला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई