मुंबई : मध्य रेल्वेने दादर-साईनगर शिर्डी आठ सुपरफास्ट विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान आठवड्यातून एक दिवस ट्रेन धावेल. ट्रेन नंबर 0२१३१ दादर येथून ३ ते २४ फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक शुक्रवारी २१.४५ वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी ३.४५ वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0२१३१ साईनगर शिर्डी येथून ४ ते २५ फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक शनिवारी ९.२0 वाजता सुटेल आणि दादर स्थानकात त्याच दिवशी १५.२0 वाजता पोहोचेल. ट्रेनला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड आणि कोपरगाव येथे थांबा देण्यात येईल. २६ जानेवारीपासून या ट्रेनचे आरक्षण सुरू होईल. या ट्रेनसाठी विशेष शुल्क आकारले जाईल. (प्रतिनिधी)
दादर-साईनगर शिर्डी आठ विशेष ट्रेन
By admin | Updated: January 25, 2017 03:49 IST