शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण: उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 6:18 AM

दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणांचा तपास मंद गतीने करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता का, असा सवाल उच्च न्यायालयाने सीबीआयला शुक्रवारी केला.

मुंबई : डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणातील तीन आरोपींची पुणे सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केल्याने उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना धारेवर धरले. दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणांचा तपास मंद गतीने करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता का, असा सवाल उच्च न्यायालयाने सीबीआयला शुक्रवारी केला.दाभोलकर व पानसरे हत्येप्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा, यासाठी दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकील अभय नेवगी यांनी दाभोलकर हत्येप्रकरणातील तीन आरोपींचा जामीन पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केल्याची माहिती दिली. त्यावर न्यायालयाने तपासयंत्रणेची ही निष्काळजी असल्याचे म्हटले.सीबीआयने उच्च न्यायालयात प्रगती तपास अहवाल सादर केला. तो वाचल्यावर न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने तपास मंद गतीने करण्याचा प्रयत्न केला होता का, अशी शंका उपस्थित केली. आधीच्या अहवालात सीबीआयने काही उजव्या जहालवादी संस्थेच्या सदस्यांची नावे नमूद केली होती; त्या लोकांवर काय कारवाई करणार, याची माहितीही दिली होती, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. याच सदस्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी सबळ पुराव्यांची आवश्यकता आहे. काही आरोपींनी जबाबात ज्या आरोपींची नावे घेतली; त्यावरून या सदस्यांच्या नावाचा उल्लेख अहवालात केला, असे सीबीआयतर्फे अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले.दोषारोपपत्र दाखल करण्यास विलंब का?न्यायालयाने तपासयंत्रणांवर नाराजी दर्शवली. ‘तुमचे अधिकारी हुशार आणि अनुभवी आहेत. किती वेळेत दोषारोपपत्र दाखल करावे, याची माहिती त्यांना आहे. मग या केसमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यास विलंब का लागला? कायद्याने बंधनकारक असलेल्या मुदतीतच दोषारोपपत्र दाखल करा. प्रक्रियेत राहिलेल्या त्रुटींचा फायदा आरोपींना होता कामा नये,’ असे म्हणत न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी १७ जानेवारी रोजी ठेवली.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरGovind Pansareगोविंद पानसरेMurderखून