शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Nisarga: केंद्रीय पथक करणार नुकसानीची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:49 IST

१५ ते १८ जून असा असणार कोकण दौरा

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने कोकणामध्ये हानी झाली आहे. कोकणातील जनतेला आर्थिक मदतीचा हात मिळावा, यासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथक १५ ते १८ जून या कालावधीत कोकण दौऱ्यावर येत आहे.केंद्र सरकारने नेमलेल्या या पथकाचे प्रमुख रमेश कुमार गांटा (आयएएस) हे आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पथकामध्ये बी.के. कौल (संचालक, अर्थमंत्रालय, नवी दिल्ली), एन.आर.एल.के. प्रसाद (संचालक, ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली), एस.एस. मोदी (उपसचिव, ग्रामीण विकास, मंत्रालय, नवी दिल्ली), आर.पी. सिंग (संचालक, कृषी मंत्रालय, नागपूर) आणि अंशुमाली श्रीवास्तव (मुख्य अभियंता, रस्ते वाहतूक, महामार्ग, मुंबई) यांचा समावेश आहे. केंद्रीय पथकाचे १५ जून रोजी मुंबईत आगमन होणार आहे. त्यानंतर १६ जून रोजी सकाळी सव्वानऊ वाजता भाऊचा धक्का येथून रो-रो सेवेने रायगड मांडवा जेट्टीकडे प्रयाण करणार आहे. मांडवा जेट्टी येथे सकाळी १० वाजता पथक दाखल होणार आहे. अलिबाग-चौल, मुरूड, श्रीवर्धनचा दौरा ते करणार आहेत. त्यानंतर १७ जूनला महाडहून रत्नागिरीकडे प्रयाण करून दिवसभर तेथील नुकसानीची पाहणी करणार आहेत. १८ जून रोजी दापोलीहून सकाळी लवकर निघून ते मांडवा जेट्टी येथून रो-रो सेवेने मुंबईला रवाना होणार आहेत.कोकणला आणि कोकणी माणसाला पुन्हा उभे करायचे असेल तर केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत होणे गरजेचे आहे. केंद्रीय पथक याची पाहणी करून त्याचा अहवाल केंद्र सरकाला सादर करणार आहे. त्यानंतरच केंद्राकडून राज्याच्या झोळीत किती हजार कोटी रुपयांची मदत पडणार हे स्पष्ट होईल.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ