शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण मुंबईत दर रविवारी सायकल ट्रॅक, एनसीपीए ते सी-लिंक दरम्यान २२ किमीचा ट्रॅक प्रस्तावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 20:18 IST

प्रदूषणमुक्त मुंबईसाठी सायकलला प्रोत्साहन देण्याचे धोरण मुंबई महापालिकेने यापूर्वीच अवलंबले आहे. त्यानुसार मोफत सायकल पार्किंग सेवेनंतर आता सायकल ट्रॅक तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबई- प्रदूषणमुक्त मुंबईसाठी सायकलला प्रोत्साहन देण्याचे धोरण मुंबई महापालिकेने यापूर्वीच अवलंबले आहे. त्यानुसार मोफत सायकल पार्किंग सेवेनंतर आता सायकल ट्रॅक तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. चर्चगेट स्टेशनजवळ असणा-या एनसीपीएपासून ते वरळी सी-लिंकपर्यंत दर रविवारी व काही शनिवारी सकाळी ६ ते ११ या वेळेत सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे सायकलप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.मुंबईच्या रस्त्यांवर गाड्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने सायकल टू वर्क म्हणजेच घर ते कार्यालय सायकलवरून प्रवास करण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण मुंबईत मोफत सायकल पार्किंग सेवा गेल्या वर्षी जुलै महिन्यात आणली. त्यानंतर आता सायकल ट्रॅक तयार करण्याचे प्रस्तावित आहे. हा सायकल ट्रॅक एनसीपीए - नेताजी सुभाष मार्ग (मरिन ड्राइव्ह), बाबुलनाथ, गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), ऍनी बेझंट मार्ग, खान अब्दुल गफ्फार खान मार्ग, राजीव गांधी सागरी सेतू (वरळी सी-लिंक) अशा सुमारे ११ किमीच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा म्हणजेच २२ किमी एवढ्या अंतराचा प्रस्तावित करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.या सुमारे २२ किमीच्या सायकल ट्रॅकसाठी पायाभूत सुविधा महानगरपालिकेतर्फे तयार केल्या जाणार आहेत. तर दर रविवारी व काही शनिवारी सायकल ट्रॅकचे व्यवस्थापन, संचलन व समन्वय करण्यासाठी महापालिकेने इच्छुक उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था इत्यादींकडून प्रस्ताव मागविले आहेत. निवड होणा-या संस्थेला हे काम प्रायोजित करण्याच्या अटी व शर्तींवर जाहिरात करता येणार आहे. याबाबत इच्छुक उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था १३ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महापालिकेच्या 'ए' विभाग कार्यालयाशी संपर्क साधून आपले प्रस्ताव सादर करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.